नवी दिल्ली : Offer on Noise Smartwatch : ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर Monsoon Carnival सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बंपर डिस्काउंट दिले जात आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरेल. सध्या नियमित घड्याळाच्या तुलनेत स्मार्टवॉटचा वापर वाढला आहे. अनेक हेल्थ फीचर्स, स्पोर्ट्स मोड, कॉलिंग सपोर्ट आणि स्टाइलिश लूक यामुळे स्मार्टवॉचला प्राधान्य दिले जात आहे. अॅमेझॉनच्या सेलमध्ये Noise च्या वॉचला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. सेलमध्ये Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch डिस्काउंटनंतर २ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. नॉइसच्या या शानदार स्मार्टवॉचवर मिळणाऱ्या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: धुमाकूळ घालायला येतोय Samsung चा स्वस्तात मस्त स्मार्टफोन, फीचर्स तुमचे मन जिंकेल

Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch ची किंमत:

Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch ची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे. परंतु, अॅमेझॉन सेलमध्ये तुम्ही वॉचला ३,१०० रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. डिस्काउंटनंतर नॉइसची ही वॉच फक्त १,८९९ रुपयात तुमची होईल. वॉचवर कोणतीही बँक ऑफर उपलब्ध नाही. परंतु, डिस्काउंटनंतर तुम्ही ५ हजारांच्या स्मार्टवॉचला फक्त १,८९९ रुपयात खरेदी करू शकता.

वाचा: ऑफर्सचा पाऊस! Amazon वर सुरू आहे खास सेल, अवघ्या २०० रुपयांच्या बजेटमध्ये मिळतील अनेक उपयोगी वस्तू

Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch चे फीचर्स:

Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch मध्ये १० दिवसांची दमदार बॅटरी लाइफ दिली आहे. यामध्ये ६० पेक्षा अधिक वॉच फेसचा सपोर्ट देण्यात आला आहे. वॉचमध्ये १.४ इंच फुल टच एचडी डिस्प्ले दिला आहे. यासोबतच हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकिंग, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर सारखे अनेक हेल्थ फीचर्स दिले आहे. पाण्यापासून सुरक्षेसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. ही स्मार्टवॉच अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसशी कंपेटिबल आहे. यात ८ स्पोर्ट्स मोडचा सपोर्ट देखील मिळतो. नॉइसच्या या स्मार्टवॉचमध्ये मॅग्नेटिक चार्जर दिला आहे. सोबतच, कंपनी १ वर्षाची वॉरंटी देखील देत आहे. दरम्यान, १८९९ रुपयांच्या बजेटमध्ये Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch दमदार फीचर्स ऑफर करते. यात तुम्हाला वेगवेगळ्या हेल्थ फीचर्स देखील सपोर्ट मिळतो. तुम्ही जर २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणारी शानदार वॉच शोधत असाल तर Noise ColorFit Pulse Spo2 Smart Watch एक चांगला पर्याय आहे.

वाचा: विवाहित महिला Google वर नक्की काय सर्च करतात? वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकितSource link

Leave a Reply

Your email address will not be published.