अकोला : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून वेतनापोटी मिळणारं अनुदान कमी करण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णयावर शिवसेनेने टीका केली आहे. शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी आज सरकारवर जळजळीत टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटींचं वेतनाचं अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलाय, असा आरोप विजय मालोकार यांनी केला. आर्थिक संकटातून एखाद्या कर्मचाऱ्याचं बरं-वाईट झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशाराही दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत?. पुढच्या काळातील याविरोधात उभारल्या जाणाऱ्या आंदोलनाला सरकारच जबाबदार असणार, असे विजय मालोकार म्हणाले.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा पगारासाठी ३६० कोटी रूपये दिले जातील, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या पगारासाठी फक्त १०० कोटी रुपये अनुदान दिले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगाराचे जे हप्ते आहेत, उदा; एलआयसी, पीएफ, घर बांधनी कर्ज दिल्या जाणाऱ्या पगारातून सध्या होत नाही. फक्त निव्वळ वेतन मिळतं आहे. दरम्यान अशा वातावरणात एखाद्या कर्मचाऱ्यांचे निधन झालं, एखादी दुर्घटना घडली तर त्याला या मधून कोणतीही अनुदान मिळणार नाही, तो या मोबदल्यापासून वंचित राहणार आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे हप्ते फेडता येत नाहीत. गेल्या दोन महिन्यापासून फक्त कर्मचाऱ्यांना नेट पगार मिळत असल्यामुळे घराचं कर्ज फेडू शकला नाही, अशा परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांच घर कधीही जप्त होऊ शकतं, असेही मालोकार म्हणाले.

हवा होता जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट; ३५० किलोमीटर प्रवास करून वाचवले १७ वर्षाच्या मुलीचे प्राण

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत? तेव्हा खोटे खोटे आश्वासन दिले, आज या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याय या गोष्टीसाठी आता महाराष्ट्र एसटी कामगार सेना मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. आगामी काळात एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटले गेले नाहीत, तर आगामी काळात एक मोठ आंदोलन उभारू असा इशाराही मालोकार यांनी दिला आहे.

मागच्या बोर्डची कल्पना नव्हती, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून कारभाराचा आरोप, श्रीकांत शिंदेंचं उत्तर

शिंदे सरकार अस्थिर, ४० आमदारांवर टांगती तलवार; जयंत पाटलांचा पुनरुच्चारSource link

Leave a Reply

Your email address will not be published.