‘स्टेज इज ऑल युवर्स’:महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने उपक्रम
प्रत्येक कलाकाराला आपली कला ही योग्य ठिकाणी सादर व्हावी, त्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध असाव्यात, कलाकारांना आणि प्रेक्षकांनाही कलेचा आस्वाद घेताना एक व्यावसायिक अनुभव यावा अशी इच्छा असते. मात्र प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकारांना आर्थिक बाबी सांभाळत हे प्रत्येक वेळेला शक्य होतेच असे नाही. हेच लक्षात घेत महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि श्रीराम लागू रंग अवकाश यांच्या संयुक्त विद्यमाने खास प्रायोगिक सादरीकरणांसाठी ‘स्टेज इज ऑल युवर्स’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सदर उपक्रमा अंतर्गत प्रायोगिक सादरीकरणांसाठी नाममात्र दरात श्रीराम लागू रंग अवकाश उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली. देशमुख पुढे म्हणाले की, पुणे अथवा पुण्याबाहेरच्या अनेक कलाकारांच्या गटांना चांगल्या व्यावसायिक जागी आपले प्रयोग करायचे असतात. शिवाय सांगीतिक कार्यक्रम, नृत्य विषयक कार्यक्रम, अभिवाचन अथवा व्हिज्युअल आर्ट अशा कलाप्रकारांप्रमाणे त्यांच्या गरजाही वेगवेगळ्या असतात. या सर्व गोष्टींची आर्थिक घडी बसविताना अनेकदा समस्या येतात. याच बाबी लक्षात घेत प्रायोगिक कलाकारांना प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याचा हेतूने आम्ही ‘स्टेज इज ऑल युवर्स’ हा उपक्रम सुरु करीत आहोत. या अंतर्गत टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग अवकाश या ठिकाणी नाममात्र दरात कलाकारांना सभागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाला प्रायोगिक सादरीकरण करणाऱ्या कलाकारांकडून देखील प्रतिसाद मिळत असून या अंतर्गत तीन कार्यक्रम येत्या महिनाभरात होत आहेत. यामध्ये ३० सप्टेंबर रोजी डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी यांचा ‘अनवट शांताबाई’, ७ ऑक्टोबर रोजी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील बीएमसीसी पुणे निर्मित ‘मायग्रेशन’ (स्थलांतर) आणि व्हीआयआयटी पुणे निर्मित ‘इन परस्युट ऑफ…’ या दोन नाटकांचे सादरीकरण आणि २१ ऑक्टोबर रोजी नादरूप या कथक संस्थेच्या वतीने ‘कोरिओग्राफी कॅलिडोस्कोप’ या कार्यक्रमांचा समावेश असल्याची माहिती राजेश देशमुख यांनी दिली. ‘स्टेज इज ऑल युवर्स’ या उपक्रमासोबतच महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने ‘रसार्थ’ हा साहित्यविषयक उपक्रम देखील हाती घेण्यात आला असून यामध्ये साहित्य विषयी चर्चा, अभिवाचन आणि कलाकार भेटीचा कार्यक्रम होईल. दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी श्रीराम लागू रंग अवकाश या ठिकाणी सदर कार्यक्रम होणार आहे.