मुंबई : साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना सगळ्यांचीच आवडती आहे. तिच्या अदांवर अनेक जण फिदा होतात. नुकतीच ती दिल्लीत एका कार्यक्रमानिमित्तानं गेली होती. तिथला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे काय! भरपूर मानधन घेऊनही सनी देओलने दिला काम करण्यास नकार

रश्मिकाच्या या अदाकारींवर फॅन्स खूश
कार्यक्रमात रश्मिका स्टेजवर चढली. त्या आधी तिनं त्या मंचाला नमस्कार केला. तोही अगदी वाकून. हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आणि त्याला चाहत्यांची पसंती मिळाली. रश्मिकाचं कौतुक सुरू झालं. रश्मिकानं ब्लॅक अँड व्हाइट क्राॅप टाॅप घातलाय. ब्लू डेनिम जॅकेटबरोबर पिंक पँट घातली आहे.


‘गुडबाय’चं नवं गाणं
रश्मिका तिचा हिंदी सिनेमा गुडबायच्या प्रमोशनसाठी दिल्लीत पोहोचली होती. गुडबाय सिनेमाचं नवं गाणं बाहेर आलंय. रश्मिकानं ते इन्स्टावर शेअर करत लिहिलं आहे, ‘मी हे गाणं ऐकलं आणि ऐकतच राहिले. ते बंद करवत नाही. मला आशा आहे की मला जेवढं हे गाणं आवडलं, तेवढं तुम्हालाही आवडेल. ७ ऑक्टोबरला गुडबाय.’ या गाण्याला संगीत अमित त्रिवेदीनं दिलंय आणि शरवी यादवनं ते गायलंय.

बिग बींबरोबर रश्मिका
गुडबाय सिनेमात रश्मिका मंदाना अमिताभ बच्चन यांच्या मुलीची भूमिका साकारत आहे. दोघांमध्ये सतत वाद होतायत. स्वत:ला स्वावलंबी करण्यासाठी ती घराबाहेर पडते. परत येते ती आईच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावरच. वडिलांना रितीरिवाजासहित पत्नीला शेवटचा निरोप द्यायचाय. तर मुलांना ते मान्य नाही. शेवटी दोन मुलगे, सुना, मुलगी आईला गुडबाय म्हणतात. सिनेमात काॅमेडी, वादावादी, इमोशन्स असा भरपूर मसाला आहे.

अर्जुन कपूरच्या बहिणीने पहिल्यांदाच शेअर केला बिकिनी फोटो; म्हणाली, शरीरावरील स्ट्रेच मार्क..

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिकाचा हा पहिला हिंदी सिनेमा. या सिनेमाच्या माध्यमातून रश्मिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

तु मेरे दिल मे रहने के लायक नही, राखी सावंतची आदिलवर मिश्किल टीप्पणी

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.