अशा परिस्थितीत जर तुम्हीपण टाटा समूहाच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू पाहत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. टाटा समूहातील एका स्टॉकवर देशांतर्गत ब्रोकरेजने खरेदीचा सल्ला दिला असून हा शेअर अगदी परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. विशेष म्हणजे सध्याच्या किमतीवरून शेअर १३% उडी घेण्याची शक्यता आहे.
टाटा स्टीलवर ब्रोकरेजने नवीन टार्गेट
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधर राठी यांनी नोव्हेंबरच्या संशोधन अहवालात टाटा स्टीलवर खरेदी करण्याचा सल्ला देत सध्याच्या पातळीपासून या शेअरमध्ये चांगली वाढ होण्याचेही भाकीत वर्तवले आहे. तथापि परताव्याच्या बाबतीत टाटा स्टीलने अलीकडच्या काळात गुंतवणूकदारांची निराशा केली असून गेल्या एका महिन्यात स्टॉक ३%हून अधिक घसरला आहे.
टाटा स्टीलचा स्टॉक ११९ रुपयांवर घसरला असून सेप्टेंबर २०२५ पर्यंत स्टॉक १३८ रुपयांवर उडी घेऊ शकतो. यापूर्वी, ब्रोकरेजने टाटा स्टीलच्या शेअर्सवर १४४ रुपये प्रति शेअर्स लक्ष्य दिले होते. परंतु, आता खरेदी कॉल सुधारित रेटिंगसह कायम ठेवण्यात आला आहे.
टाटा स्टीलचे तिमाही निकाल
अलीकडेच कंपनीने आपले तिमाही निकाल जारी केले ज्यात टाटा स्टीलने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत ६,५११.१६ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला. तथापि, निकालानंतर शेअर घसरला पण फार खोलवर गेला नाही. तसेच कंपनीच्या युरोपियन कामकाजावर दबाव आल्याने कंपनीला तोटा सहन करावा लागला. तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत टाटा स्टीलने १,२९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.
(Disclaimer: इथे फक्त शेअर्सच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक धोक्याच्या अधीन आहे, त्यामुळे एक्स्पर्टचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. तुमचे आर्थिक लाभ किंवा नुकसानीला महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन जबाबदार नाही.)