कोणत्या ब्लॉक डीलमुळे शेअर्समध्ये मोठी खरेदी
ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, आज ब्लॉक डील अंतर्गत टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये सुमारे १५५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हे शेअर्सच्या एकूण ०.२ टक्के हिस्सेदारीइतके आहे. या ब्लॉक डील अंतर्गत सुमारे ५२.५ लाख शेअर्सचे व्यवहार झाले. एनएसईवर २७० रुपये प्रति शेअर प्रमाणे हा व्यवहार झाल्याचे कळते. मात्र, या करारांतर्गत शेअर्स कोणी विकत घेतले आणि कोणाला विकले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
टाटा पॉवरचे कामकाज
टाटा पॉवर वीज निर्मिती आणि पुरवठा करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. ही औष्णिक, जलविद्युत आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीचा समावेश असलेले पॉवर प्लांट चालवते. या आर्थिक वर्षाच्या (२०२३-२४) च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून २०२३ मध्ये कंपनीचा परिचालन महसूल ४.९५ टक्क्यांनी वाढून १५ हजार २१३ कोटी रुपयांवर गेला आणि निव्वळ नफा २९.०७ टक्क्यांनी वाढून १,१४१ कोटी रुपयांवर गेला. या कालावधीत कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन ६ टक्क्यांनी वाढून १८ टक्के झाले आहे.
कंपनीच्या शेअर्सची कामगिरी
आता जर आपण शेअर्सबद्दल बोललो तर ६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ते सुमारे ५२ टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. २८ मार्च २०२३ रोजी स्टॉक १८२.४५ रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तो ५१.५५ टक्क्यांनी वाढून आज २७६.५० रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या वर्षभरात शेअरने ११.१६ टक्क्यांची म्हणजेच २७ रुपयांनी वाढ नोंदवली आहे.