मुंबई : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे ७५ व्या वर्षी मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात दीर्घकाळ आजाराने निधन झाले आहे. एकेकाळी देशातील सर्वात शक्तिशाली व्यावसायिक घराण्यांपैकी सहारा समूहाचा व्यवसाय रिअल इस्टेट, मीडिया, हॉस्पिटॅलिटी, आर्थिक सेवा आणि एअरलाइन्समध्ये पसरलेला असून त्यांनी आयपीएलमध्येही संघ खरेदी केला होता. तसेच त्यांनी ग्रुपची फॉर्म्युला वन टीम फोर्स इंडियामध्येही गुंतवणूक केली असताना त्यांनी अनेक वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकही होते. याशिवाय सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय यांचा आवाज सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये ऐकू यायचा. अनेक बडे नेते आणि अभिनेत्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाला हाजरी लावली होती, मग असं काय झाले की अशा प्रभावशाली माणसाला तुरुंगात जावे लागले?

एका पत्राने उघड केली अनियमितता
सहारामध्ये सुरू असलेल्या कथित अनियमिततेचे संपूर्ण सत्य एका पत्रामुळे उघड केल्याचे सांगितले जाते. परंतु त्या पात्रात काय होते आणि ते पात्र कोणी लिहिले होते? ४ जानेवारी २०१० रोजी रोशन लाल नावाच्या व्यक्तीने नॅशनल हाऊसिंग बँकेला (NHB) हिंदीत एक पात्र पाठवले ज्यात त्यांनी स्वतःला इंदूरचा रहिवासी आणि व्यवसायाने सीए असल्याचे सांगितले.

सहारा ग्रुपचे सुब्रत रॉय यांचे निधन; आजारामुळे वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
या पत्रात त्यांनी NHB ला सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन आणि सहारा हाऊसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या लखनौच्या सहारा ग्रुपच्या दोन कंपन्यांनी जारी केलेल्या रोख्यांची चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यांनी म्हटले की, मोठ्या संख्येने लोकांनी सहारा समूहाच्या कंपन्यांचे रोखे खरेदी केले आहेत, परंतु ते नियमानुसार जारी करण्यात आलेले नाहीत.

सेबीकडेही पत्र पाठवले
रोशन लाल यांनी केलेल्या आरोपांनी चौकशी करण्याचे नॅशनल हाऊसिंग बँकेला अधिकार नव्हते, म्हणून त्यांनी भांडवली बाजार नियामक सेबीकडे पात्र पाठवले. एका महिन्यानंतर सेबीला अहमदाबाद स्थित प्रोफेशनल ग्रुप फॉर इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन या वकिली गटाकडून असेच एक पत्र मिळाले. २४ नोव्हेंबर २०१० रोजी सेबीने सहारा समुहावे जनतेकडून कोणत्याही स्वरुपात पैसे गोळा करण्यावर बंदी घातली.

स्कूटर ते विमानापर्यंतचा प्रवास; …असे श्रीमंतीच्या शिखरावर पोहोचले ‘सहाराश्री’, मग भोगला तुरुंगवास
अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि न्यायालयाने सहारा समूहाला १५% वार्षिक व्याजासह गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले. ही रक्कम २४,०२९ कोटी रुपये होती.

याशिवाय २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सहारा समूहाच्या कंपन्यांनी सेबी कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. बँकिंग सुविधांचा लाभ न घेऊ शकणाऱ्या लाखो भारतीयांकडून हा पैसा उभारण्यात आल्याचे कंपन्यांनी सांगण्यात आले असून सहारा समूहाच्या कंपन्या गुंतवणूकदारांना पैसे देण्यात अपयशी ठरल्यावर न्यायालयाने रॉय यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यावर ते ६ मे २०१७ पासून पॅरोलवर बाहेर होते. आईच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्याच्या नावाखाली त्याला पहिल्यांदा पॅरोल मिळाला, ज्याला नंतर मुदत वाढ देण्यात आली.

Read Latest Business News

कोण होते रोशन लाल?
सहारा समूहाने रोशन लालचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ते सापडले नाही. सहारा समूहाच्या वकिलांनी ऑन रेकॉर्ड सांगितले होते की सहारा प्राइम सिटी इश्यूचे मर्चंट बँकर एनम सिक्युरिटीजने इंदूरच्या जनता कॉलनी येथील रोशन लाल यांच्या पत्त्यावर पत्र पाठवले होते, परंतु ते परत करण्यात आले. पत्ता सापडला नाही असे त्यावर लिहिले होते. एवढेच नाही तर या प्रकरणात इच्छुक असलेल्या अनेकांनी रोशन लालचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाही. तर रोशन लाल नावाची व्यक्ती नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून हे काम कॉर्पोरेट प्रतिस्पर्ध्याद्वारे केल्यास सांगितले गेले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *