नवी दिल्ली: जर तुमच्यात काही करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. जर तुम्ही हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करत राहिले तर यश निश्चित आहे. देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी सन फार्मास्युटिकलचे (Sun Pharmaceutical) संस्थापक आणि एमडी दिलीप संघवी यांनी असेच काहीसे केले आहे.

एक काळ असा होता जेव्हा दिलीप संघवी हे औषध वाटपाचे काम करायचे. ते फिरुन-फिरुन औषध कंपन्यांची औषधं विकायचे. एके दिवशी अचानक त्यांच्या मनात विचार आला की जर मी इतरांनी बनवलेली औषधं विकू शकतो तर माझी स्वतःची का नाही.

दिलीप संघवी यांचा जन्म गुजरातमधील अमरेली येथे झाला होता. १९८२ मध्ये त्यांनी वडिलांकडून २००० रुपये कर्ज घेतले आणि त्यांच्या मित्रासोबत गुजरातमधील वापी येथे त्यांची फार्मास्युटिकल कंपनी सन फार्मा सुरू केली. सुरुवातीला कंपनीने अनेक प्रकारची औषधं तयार करण्याऐवजी चांगल्या दर्जाच्या औषधांवर भर दिला. कंपनीच्या मार्केटने चांगली कामगिरी केली.

प्राचीन नाणी अन् मौल्यवान रत्नांचा खजिना सापडला, नाण्यांवर देवतांचे चित्र, पुरातत्वशास्त्रज्ञांचे डोळे चकाकले
त्यानंतर १५ वर्षांनंतर, १९९७ मध्ये, दिलीपने तोट्यात चालणारी अमेरिकन कंपनी कार्को फार्मा विकत घेतली. जेणेकरून ते अमेरिकन बाजारात पोहोचू शकेल. यानंतर २००७ मध्ये कंपनीने इस्रायली कंपनी तारो फार्मा खरेदी केली. २०१२ मध्ये संघवी यांनी चेअरमन आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला होता. या युनिटमध्ये ते मानसोपचाराशी संबंधित औषधे बनवत असे.

भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी

सन फार्मा सुरू झाली तेव्हा त्यात दोनच कर्मचारी काम करायचे. पण, आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने दिलीप यांनी अवघ्या चार वर्षांत सन फार्मास्युटिकलचा देशभरात विस्तार केला. १९९७ मध्ये सन फार्माने कॅराको फार्मा ही अमेरिकन कंपनी विकत घेतली. सन फार्मा सतत प्रगती करत होती. २००७ मध्ये इस्रायलची तारो फार्मा विकत घेतली. २०१४ मध्ये रॅनबॅक्सीला २५२३७ कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, सन फार्मा ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील पाचवी सर्वात मोठी फार्मा कंपनी बनली.

पती पत्नीनं बनावट स्क्रीनशॉटद्वारे तब्बल ४०० जणांना घातला गंडा, सापळा रचून पोलिसांनी केली अटक

संघवी यांची नेट वर्थ किती आहे?

२०१४ मध्ये सन फार्मा आणि रॅनबॅक्सी यांच्यात करार झाला होता. ज्यानंतर बरेच काही बदलले. सन फार्माने रॅनबॅक्सीला सुमारे १९ हजार कोटी रुपयांना विकत घेतले आहे. २०१४ च्या अखेरीस, दिलीप संघवी यांची एकूण संपत्ती १७.८ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

सिगारेटचे चटके दिले, मुंडन, विवस्त्र केलं अन्…, अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अमानूष अत्याचार
Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *