नवी दिल्ली: भारताची दिग्गज आयटी कंपनी, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली, ज्यामध्ये पद्मभूषण पुरस्कारासाठी सुधा मूर्ती यांची निवड करण्यात आली. सुधा मूर्ती यांना यापूर्वी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

सुधा मूर्ती औद्योगिक जगतात आदरणीय आहेत. पत्नी सुधा यांनी दिलेल्या १० हजार रुपयांच्या मदतीच्या जोरावर नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसची स्थापना केली. कोट्यवधींची संपत्तीच्या मालकीण असूनही सुधा मूर्ती साधेपणाने राहतात. त्यांच्या जीवनातील अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या लोकप्रिय आहेत आणि लोकांना मोठा धडा शिकवतात. त्यापैकी काही निवडक पाहूया…

झाकीर हुसेन, मुलायमसिंग यादव, सुमन कल्याणपूर, सुधा मूर्ती यांना पद्म पुरस्कार… वाचा संपूर्ण यादी

मुलाला मदत करण्यास शिकवले
सुधा मूर्ती यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा एक किस्सा सांगितला, ज्यामध्ये त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या पार्टीवर ५० हजार रुपये खर्च करण्याऐवजी एक छोटीशी पार्टी देत उर्वरित पैसे ड्रायव्हरच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्यायचे, असे आपल्या मुलाला सांगितले. मूर्ती यांनी सांगितले, “पहिले तर माझ्या मुलाने यासाठी नकार दिला, पण तीन दिवसांनी तो तयार झाला. काही वर्षांनी त्यांचा मुलगा स्वतः शिष्यवृत्ती घेऊन आला आणि २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पैसे वापरण्यास त्याने सांगितले. मूर्ती म्हणाल्या की मुलांना पैसा, दया, प्रेम आणि आशा वाटून घेण्याची शिकवण देणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे ते सर्वांना समान वागणूक देतात.”

सलवार-कमीजसाठी टोमणे ऐकले
बँकेत कोट्यवधी रुपये असले तरी सुधा मूर्ती साधेनपणाने राहणे पसंत करतात. आज त्यांचे जावई, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान असले तरी याच देशात त्यांना सलवार-कमीज परिधान करण्यासाठी टोमणे ऐकावे लागले होते. तुम्ही ‘कॅटल क्लास’मध्ये आहात म्हणून तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, असे मूर्ती यांना लंडनच्या हिथ्रो विमानतळावर सांगण्यात आले होते. श्रीमती मूर्ती यांनी स्वतः एका पॉडकास्टमध्ये सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित कर्मवीर दादासाहेब इदाते आणि विचारवंत रमेश पतंगे यांना पद्मश्री

सुधा मूर्ती म्हणाल्या की, “मी सलवार-कमीज घातला होता आणि मी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर होते, मग कोणीतरी म्हणाले की तुम्ही इकॉनॉमी क्लासमध्ये उभे रहा, कारण तुम्ही कॅटल क्लासचे आहात. त्यांना वाटलं मला इंग्रजी येत नाही… आजकाल लोक बघतात… तुम्ही साडी, सलवार-सूट घातलाय आणि तुम्ही साधे दिसत आहेत, मेकअप नाही म्हणजे तू अशिक्षित आहेस.”

पतीला मदतीचा हात
भारतासह जगातील दिग्गज आयटी कंपन्यांपैकी एक, इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून घेतलेल्या १०,००० रुपयांनी कंपनीची स्थापना केली. नारायण मूर्ती म्हणतात की त्यांची पत्नी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक अडचणीत त्या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या.

कलेचा सन्मान! सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तर झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण जाहीर

मदतीचा अनोखा मार्ग
एकदा बंगलोरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये, TC ला सीट खाली ११ वर्षांची एक मुलगी लपून बसलेली दिसली. मुलगी रडत म्हणाली की तिच्याकडे तिकिटासाठी नाही. तिकीट चेकरने तिला खडसावले आणि गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. ट्रेनमध्ये सुधा मूर्तीही होत्या, त्यांनी लगेच मुलीचे बंगलोरपर्यंतचे तिकीट बनवा, पैसे मी देईन, असे सांगितले. तिकीट चेकरने म्हटले, मॅडम तिकीट काढण्यापेक्षा दोन चार रुपये दिले तर ती जास्त आनंदी होईल. पण मूर्ती यांनी मुलीचेच तिकीट काढले.

जेव्हा त्यांनी मुलीला कुठे जातेय सारे विचारले, ती म्हणाली, “मला माहित नाही, मॅडम.” त्या मुलीचे नाव चित्रा होते. मूर्ती तिला बंगळुरूला घेऊन आल्या आणि एका स्वयंसेवी संस्थेत दाखल केले. चित्रा तिथेच राहून अभ्यास करू लागली, मूर्तीही तिची तब्येची विचारपूस करायच्या. तब्बल २० वर्षांनी मूर्ती अमेरिकेत एका कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमानंतर बिल भरण्यासाठी रिसेप्शनवर आल्या तेव्हा समोर बसलेल्या एका जोडप्याने बिल भरल्याचे समजले. मूर्ती जोडप्याकडे वळून त्यांना विचारले, “तुम्ही माझे बिल का भरले? त्यावर ती मुलगी म्हणाली, “मॅडम, गुलबर्गा ते बंगलोरच्या तिकिटाच्या तुलनेत हे काहीच नाही.” ती मुलगी चित्रा होती. मूर्तींच्या त्या दिवशी केलेल्या मदतीने चित्राचे आयुष्य बदलले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *