मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) सध्या खूपच चर्चेत आली आहे. २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याच्याशी तिचं नातं असल्यामुळे ती चर्चेत आहे. याशिवाय त्यानं केलेल्या पैशांच्या अपहाराप्रकरणी जॅकलिनची सातत्यानं ईडीकडून चौकशी केली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीमध्ये जॅकलिनबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. सुकेशनं केलेल्या पैशांच्या घोटाळ्याप्रकरणी जॅकलिनबरोबरच नोरा फतेही हिची देखील आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे.

सुकेशनं केलेल्या २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अर्थात ईओडब्ल्यूनं जॅकलिनची बुधवारी आठ तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यावेळी जॅकलिन आणि नोरा या दोघीजणी या अपहारामध्ये थेट सहभागी नव्हत्या. सुत्रांनी दिलेल्या महितीनुसार जॅकलिनला सुकेशशी लग्न करायचं होतं. त्याचं प्लॅनिंगही तिनं केलं होतं कारण तिच्या मते सुकेशच तिच्या स्वप्नांचा राजकुमार होता.

हे वाचा-प्रिया बारावीत असताना पडलेली उमेशच्या प्रेमात; लव्ह स्टोरीमध्ये ९ आणि १८ तारखा खास

सुकेशचं सत्य कळूनही दिली साथ

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जॅकलिन फर्नांडिस सुकेश चंद्रशेखरच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. त्यामुळे त्याचं सत्य कळूनही तिनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्या संपर्कात राहिली. ईओडब्ल्यूचे विशेष पोलिस आयुक्त रविंद्र यादव यांनी सांगितलं की, ‘जॅकलिन फर्नांडिस हिनं सुकेशबाबतचं सत्य माहिती झाल्यानंतरही त्याच्या सतत संपर्कात राहिली. ही तिची सर्वात मोठी चूक ठरली. परंतु नोराला जेव्हा हे कळलं तेव्हा तिनं सुकेशशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते.’

जॅकलिनच्या मॅनेजरला दिली आठ लाखांची बाईक!

दिल्ली पोलिसांनी जेव्हा जॅकलिनचा मॅनेजर प्रशांत याच्याकडून आठ लाख रुपयंची डुकाटी सुपरबाईक जप्त केली. ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला. ही बाईक सुकेशनं प्रशांतला भेट म्हणून दिली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हे वाचा-जेव्हा ‘पावनखिंड’च्या दिग्दर्शकाने मागितली अमोल कोल्हेंची माफी; नेमकं काय घडलेलं?

नोरानं तोडले होते संबंध

दरम्यान, नोरा फतेही हिची देखील या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशी झाली. या चौकशीमध्ये तिनं सांगितलं की सुकेश याला ती कधीही भेटली नव्हती. परंतु त्याच्याशी व्हॉट्सअॅपवर दोनवेळा ती बोलली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी नोराची तिचा मेहुणा महबूब उर्फ बॉबी खान आणि पिंकी ईरानी यांच्याबरोबर चौकशी केली. पिंकी ईरानी हिनं सुकेशनं दिलेल्या सूचनेनुसार अतिशय महागड्या भेटवस्तू देण्यासाठी म्हणून नोराशी संपर्क साधल्याचं चौकशीमधून समोर आलं आहे.

नोरानं भेटवस्तू घेण्यास दिला नकार

पिंकी जेव्हा नोराला भेटली तेव्हा तिनं चेन्नई इथल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं. त्याचं आयोजन सुकेश आणि लीना मारिया करणार होते. नोराला यासाठी भरभक्कम रक्कम आणि बीएमड्ब्ल्यू गाडी देण्याचं आमिष दाखवलं होतं. परंतु चौकशीवेळी नोरानं सांगितलं की, या भेटवस्तू घेण्यास तिनं नकार दिला परंतु त्या बॉबी खानला द्यायला तिनं सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.