मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सत्तरचं दशक बॉलिवूडमध्ये चांगलच गाजवलं. शबाना आझमी यांचे मोजकेच पण प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे सिनेमे होते. सिनेमात काम करणं थांबवल्यानंतरही त्या सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या. आज १८ सप्टेंबरला त्या ७२ वा वाढदिवस साजरा (Shabana Azmi Birthday) करत आहेत. वयाची सत्तरी पार केलेल्या शबाना आझमी यांच्या सिनेमातील भूमिका तर चर्चेत आहेतच पण त्यांचं लव्हलाइफही नेहमीच चर्चेत आलं आहे.

हे वाचा-जेव्हा ‘पावनखिंड’च्या दिग्दर्शकाने मागितली अमोल कोल्हेंची माफी; नेमकं काय घडलेलं?

प्रसिध्द गीतकार-लेखक जावेद अख्तर यांच्याशी सुखाचा संसार करत असलेल्या शबाना या बॉलिवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्यावर फिदा होत्या, तर एका दिग्दर्शकासोबत त्या रिलेशनशिपमध्ये होत्या. पण शेवटी जावेद यांच्याशीही त्यांनी वडिलांच्या विरोधात जाऊन लग्नं केलं. शबान आझमी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यात त्यांना पहिल्यांदा आवडलेला अभिनेता कोण होता हे सांगितलं आणि ते नाव आहे अभिनेते शशी कपूर यांचं. होय, शशी कपूर यांच्यावर शबाना इतक्या लट्टू होत्या की त्यांना पाहण्यासाठी त्या वेड्या व्हायच्या.

Shabana Azmi Shashi Kapoor

जसे चाहते अभिनेत्रींवर फिदा होत असतात तसच या अभिनेत्रींनाही कुणीतरी खूप आवडत असतं हे किस्से आपण नेहमी ऐकतो. शबाना आझमी यांचं पहिलं क्रश होतं ते शशी कपूर. शबाना यांनी सांगितलंय की शशी कपूर त्यांना खूप आवडायचे. त्यावेळी शशी यांचं लग्न जेनिफर यांच्याशी झालं होतं. महत्वाचं म्हणजे तेव्हा शबाना आणि शशी कपूर हे एकमेकांच्या शेजारीच रहायचे.

Shabana Azmi and Shashi Kapoor

जेनिफर यांच्याशीही शबाना यांची मैत्रीण होती. दर रविवारी शशी कपूर हे शबाना यांचे वडील कैफी यांना भेटण्यासाठी घरी यायचे. शशी यांची सही घेण्यासाठी शबाना या शशी यांचा फोटो खरेदी करून ठेवायच्या आणि दर रविवारी त्या फोटोवर त्यांची सही घ्यायच्या. फकीरा या सिनेमात शबाना यांनी शशी कपूर यांच्यासोबत काम केलं. आज मी या क्षेत्रात आहे ती शशी कपूर यांच्यामुळेच असंही शबाना यांनी सांगितलं होतं.

Shabana Azmi Shekhar Kapoor

शशी कपूर हे फक्त शबाना यांचे क्रश होते, पण एका दिग्दर्शकासोबत शबाना यांची रिलेशनशिपही खूप चर्चेत आली होती. बँडीट क्वीन यासह अनेक सिनेमांचे दिग्दर्शक असलेल्या शेखर कपूर यांच्या प्रेमात शबाना बुडाल्या होत्या. अनेक दिवस शेखर कपूर आणि शबाना हे एकमेकांना डेट करत होते. पण काही कारणाने हे नातं पुढे गेलं नाही. सामंजस्याने दोघांनी वेगळं व्हायचं ठरवलं.

हे वाचा-प्रिया बारावीत असताना पडलेली उमेशच्या प्रेमात; लव्ह स्टोरीमध्ये ९ आणि १८ तारखा खास

त्यानंतर शबाना यांच्या आयुष्यात जावेद अख्तर आले. जावेद यांचं लग्न हनी ईराणी यांच्यासोबत झालं होतं आणि त्यांना जोया आणि फरहान ही दोन मुलंही होती. शबाना यांनी जावेद यांच्याशी लग्नं करण्याचा निर्णय त्यांचे वडील कैफी यांना मान्य नव्हता. पण वडिलांचा विरोध न जुमानता शबाना यांनी जावेद यांच्याशी लग्नं केलं. शशीकपूर यांच्यासोबत क्रशपासून ते जावेद यांच्याशी लग्न इथपर्यंत शबाना यांचं लव्हलाइफ फारच थ्रिलिंग आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.