पुणे : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आता शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना ( Ed Probe Against Pratap Sarnaik ) ईडीने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप केले होते. यानंतर प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरू झाली होती. मात्र आता ईडी ने त्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिला आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी भाजपला फैलावर घेतलं आहे. भाजपने सरनाईक कुटुंबीयांची माफी मागावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचं ससरकर सत्तेत असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सारनाईक यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने प्रताप सारनाईक यांच्यावर नॅशनल स्पॉट एसक्सचेंज (NSEL) प्रकरणात ११.३० कोटी रुपयांची मनी लॉन्ड्रींग केल्याची नोटीस सरनाईक यांना बजावली होती. या प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहान सरनाईक यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. मात्र आता ईडीने या प्रकरणात सरनाईकना यांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. पण या प्रकरणावरून आता सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या आहेत.

Supriya Sule : सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, ‘त्यांनी ५० खोके घेतले, त्यामुळे काम करायची गरज वाटत नाही

मी महिला खासदार म्हणून संसदेत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. आणि हा सवाल अमित शहा यांना विचारणार आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या बाबत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पत्र लिहिण्यात आलं होतं. आपण भाजप सोबत जाऊया म्हणजे अपल्यावरचे ईडी, सीबीआय आरोप बंद होतील. ज्यांच्यावर आरोप झाले ज्यांच्या घरात रेड झाली त्यांचं कुटुंब कोणत्या परिस्थितीतुन गेलं याचा विचार कधी केला का आणि आता तुम्ही म्हणता की त्यांच्या विरोधात काहीच पुरावे नाहीत. या प्रकरणात तुम्ही आधी आरोप केले ते खोटे होते का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. म्हणून आता या प्रकरणात भारतीय जनता पार्टीने सरनाईक कुटुंबीयांची हात जोडून माफी मागावी आणि जर त्यांच्यवर झालेले आरोप खोटे असतील तर भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

Murlidhar Mohol : पुण्यात भाजपची मोठी खेळी, मुरलीधर मोहोळांच्या खांद्यावर मोठी जबाबदारीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.