सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार फिक्स आमदार:बारामतीत बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार फिक्स आमदार:बारामतीत बॅनरबाजी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती-मविआकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत तक्रवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. वर्षां गायकवाड यांचे वक्तव्य गेली अनेक दिवस सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत येत आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रीपदाच्या महिला दावेदार असल्याचे म्हटले होते. यामुळे आता या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे. बारामतीत काका-पुतण्यात लढत बारामती विधानसभेतून काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. युगेंद्र पवार हे नेहमीच शरद पवार यांच्यासोबत असतात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते. त्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये संपर्क वाढवला असून ते शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात उतरतील आणि थेट अजित पवारांना आव्हान देतील, असा अंदाज आहे.​​​​​​​ कोण आहेत युगेंद्र पवार? युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्रिपदासाठी 10 जागा कमी घेण्यास उद्धवसेना तयार कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद हवेच, हा आग्रह नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. प्रत्यक्षात त्यांनी हा आग्रह अजिबात सोडलेला नाही, असे मविआच्या जागावाटप बैठकीत स्पष्ट झाले. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेण्याची तयारी उद्धवसेनेने जागावाटप बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी दाखवली. काँग्रेसने 105, उद्धवसेनेने 95 आणि शरद पवार गटाने 88 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव त्यात मांडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत जागावाटपावर चर्चा झालीच नाही, असा दावा केला. आणखी दोन दिवस हे बैठकांचे सत्र चालणार आहे. दरम्यान, बैठकीला येण्यासाठी काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नव्हते. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगपाखड केली. मविआतील नेत्यांनी 288 जागांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत आहे. उद्धवसेना मुंबईसह कोकणात तर राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आपली ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मविआलच बहुमत मिळेल, असे प्रास्ताविक करून सुरूवात झाली. काँग्रेसने 115 जागांवर दावा केला आहे. मात्र, राहुल गांधींच्या आदेशानुसार ते 105 जागांवर थांबतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे नेते फारच व्यग्र, तारखांवर तारखा देत आहेत जागा वाटप बैठकीची तारीख, वेळ, ठिकाण आधी कळवूनही काँग्रेसचे नेते वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले. तरीही ते तारखांमागून तारखा देत आहेत. काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांचा वाढता विरोध राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिले असले तरी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते त्यास अजिबात तयार नाही. मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव यांचा अनुभव चांगला नव्हता. महत्वाचे म्हणजे लोकसभेला उद्धवसेनेचे खासदार मुस्लिम आणि दलितांनी एकगठ्ठा मतदान केल्यानेच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद कशाला, असे नेत्यांचे म्हणणे आहे.

​बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून अशा आशयाचे फलक लावण्यात आलेले आहेत, यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्रीपदावरुन महायुती-मविआकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत तक्रवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांचे बारामतीतील गुणवडी चौकात फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीने बॅनर लावण्यात आले आहेत. वर्षां गायकवाड यांचे वक्तव्य गेली अनेक दिवस सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत येत आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या मुख्यमंत्रीपदाच्या महिला दावेदार असल्याचे म्हटले होते. यामुळे आता या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे. बारामतीत काका-पुतण्यात लढत बारामती विधानसभेतून काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होईल, असे सध्याचे चित्र आहे. युगेंद्र पवार हे नेहमीच शरद पवार यांच्यासोबत असतात. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले होते. त्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये संपर्क वाढवला असून ते शरदचंद्र पवार पक्षाकडून मैदानात उतरतील आणि थेट अजित पवारांना आव्हान देतील, असा अंदाज आहे.​​​​​​​ कोण आहेत युगेंद्र पवार? युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात. मुख्यमंत्रिपदासाठी 10 जागा कमी घेण्यास उद्धवसेना तयार कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रिपद हवेच, हा आग्रह नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. प्रत्यक्षात त्यांनी हा आग्रह अजिबात सोडलेला नाही, असे मविआच्या जागावाटप बैठकीत स्पष्ट झाले. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा 10 जागा कमी घेण्याची तयारी उद्धवसेनेने जागावाटप बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 सप्टेंबर रोजी दाखवली. काँग्रेसने 105, उद्धवसेनेने 95 आणि शरद पवार गटाने 88 जागा लढवाव्यात असा प्रस्ताव त्यात मांडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत जागावाटपावर चर्चा झालीच नाही, असा दावा केला. आणखी दोन दिवस हे बैठकांचे सत्र चालणार आहे. दरम्यान, बैठकीला येण्यासाठी काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नव्हते. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आगपाखड केली. मविआतील नेत्यांनी 288 जागांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत आहे. उद्धवसेना मुंबईसह कोकणात तर राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आपली ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मविआलच बहुमत मिळेल, असे प्रास्ताविक करून सुरूवात झाली. काँग्रेसने 115 जागांवर दावा केला आहे. मात्र, राहुल गांधींच्या आदेशानुसार ते 105 जागांवर थांबतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे नेते फारच व्यग्र, तारखांवर तारखा देत आहेत जागा वाटप बैठकीची तारीख, वेळ, ठिकाण आधी कळवूनही काँग्रेसचे नेते वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले. तरीही ते तारखांमागून तारखा देत आहेत. काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांचा वाढता विरोध राहुल गांधी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांना आश्वासन दिले असले तरी काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते त्यास अजिबात तयार नाही. मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव यांचा अनुभव चांगला नव्हता. महत्वाचे म्हणजे लोकसभेला उद्धवसेनेचे खासदार मुस्लिम आणि दलितांनी एकगठ्ठा मतदान केल्यानेच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपद कशाला, असे नेत्यांचे म्हणणे आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment