रायगड: महाड एमआयडीसी ब्लू जेट फार्मासिटिकल या औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीत झालेल्या मोठ्या दुर्घटनेत एकूण ११ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर या घटनेत सात जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एक कामगाराला आगीची मोठी झळ पोहचली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विक्रम डेरे असे या कामगाराचे नाव आहे.
शिफ्ट बदलणं जीवावर बेतलं, महाडमधील स्फोटात तरुणाचा होरपळून मृत्यू, BSc होण्याचं स्वप्न अधुरं
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रमचा सुट्टीचा वार बदलला होता. त्यामुळे तो या दुर्घटनेत सापडला. केवळ दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने या दुर्घटनेत बचावला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांपैकी एक युवक कामगार विक्रम डेरे हा या दुर्घटनेत २० टक्के भाजला आहे. दर शुक्रवारी त्याची सुट्टी असते. मात्र शिफ्ट बदलली आणि त्यांची आठवड्याची सुट्टीही गुरूवारची झाली. त्यामुळे शुक्रवारी तो फर्स्ट शिफ्टसाठी कंपनीत गेला होता. दुर्दैवाने शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली. आपला भाऊ थोडक्यात बचावला पण या दुर्घटनेमध्ये तो गंभीरित्या भाजला आहे, अशी माहिती जखमी विक्रम यांचा भाऊ समीर यांनी दिली आहे.

तुम्ही काय शेतकऱ्यांचं वाटोळे करायला बसले आहात काय? आमदार संतोष बांगर यांनी महाबीज कर्मचाऱ्याला सुनावलं

ही दुर्घटना झाली त्याचवेळी सकाळी १०:३० च्या सुमारास याच कंपनीला बाजूलाच असलेल्या एका कंपनीमध्ये आपण काम करत होतो. दुर्घटना घडल्याचे कळताच समीर यांच्या पायाखालची काहीवेळ जमीन सरकली. समीरने क्षणाचाही विलंब न करता कंपनीच्या इथे येऊन आपल्या भावाची चौकशी केली. यावेळी भावाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान आपल्या मुलाचा सगळा खर्च आम्ही करू, असे सांगून गेलेले अधिकारी अद्यापही तीन दिवसांमध्ये साधी विचारपूस करण्यासाठी एकदाही इकडे फिरकले नाहीत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया या दुर्घटनेत भाजलेले कामगार विक्रम डेरे यांचे वडील चिमाजी डेरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ जवळ बोलताना दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *