मुंबई : मनोरंजन विश्वात सहजसुंदर अभिनयानं अभिनेत्री हेमांगी कवी नं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबरच हेमांगी सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. तिच्या कामाबद्दलचे, तिच्या भटकंतीबद्दलची माहिती ती सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आतादेखील हेमांगीनं तिच्या कामातून ब्रेक घेतला असून ती सुट्टीवर गेली आहे. ती सुट्टीवर कुठं गेली आहे, हे सांगणारी पोस्ट शेअर केली. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे.

Health Update- विक्रम गोखले यांनी डोळे उघडले, हात पाय हलवले

हेमांगी कवी सोशल मीडियावर तिची मतं अत्यंत बेधडकपणं मांडत असते. राजकीय, सामाजिक विषय असो किंवा तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील एखादा प्रसंग असो हेमांगी मोकळेपणानं तिचं मत मांडत असते. तिच्या बेधडक मताचं अनेकदा कौतुक होतं तर अनेकदा तिच्यावर टीकादेखील होते. परंतु टीकाकारांकडे फार लक्ष न देता हेमांगी तिचं मत परखडपणे मांडत असते.


मनोरंजन विश्वात काम करणारी कलाकार मंडळी त्यांच्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढत विविध ठिकाणी भटकंती करतात. हेमंगीलादेखील फिरण्याची खूप आवड आहे. जेव्हा केव्हा हेमांगी फिरायला जाते तेव्हा तिथले फोटो ती चाहत्यांबरोबर शेअर करते. तसंच त्या ठिकाणची माहिती ती देत असते. आतादेखील हेमांगी कामातून थोडा ब्रेक घेत तिच्या गावी साताऱ्यात असलेल्या म्हसवड इथे सुट्टीवर गेली.

बेस्ट फ्रेंडच्या Ex Husband शीच करतेय हंसिका मोटवानी लग्न
म्हसवड इथं भरणाऱ्या सिद्धनाथांच्या यात्रेत ती सहभागी झाली. तिथले फोटो, व्हिडिओ हेमांगीनं तिच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो पोस्ट करताना हेमांगीनं आकर्षक अशा फोटोओळी दिल्या आहेत. तिच्या फोटोंची आणि पोस्टनं नेटकऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.


सिद्धनाथांच्या यात्रेमध्ये हेमांगी भक्तीभावानं सहभागी झाली. देवळामध्ये जाऊन तिनं सिद्धनाथांच्या पादुकांचं घेतलेल्या दर्शनाचे, त्यानंतर पालखीच्या मिरवणुकीवेळी उधळलेल्या गुलालाच्या रंगानं ती न्हाऊन गेली. त्याचे फोटो हेमांगीनं चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तसंच यात्रेमध्ये असलेल्या खाद्य पदार्थांचा आस्वादही तिनं घेतला. त्याचेही फोटो हेमांगीनं शेअर केले.


यात्रेला जाण्याआधी हेमंगीनं तिचा कारमधील एक सेल्फी पोस्ट केला होता. हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिलं, “रिफ्रेश व्हायला लोक गोव्याला जातात आपण ‘गावाला’ जातो!…सिद्धनाथ यात्रा कॉलिंग…” दरम्यान, हेमांगीनं शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक जणांनी कमेंट करत तिच्या गावाबद्दलच्या ओढीचं कौतुक केलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *