सुवर्णमयी अयोध्या… दररोज 13 लाख भाविकांच्या मुक्कामाची सोय:24 तास देशी-विदेशी उड्डाणे, एंट्रीवर भव्य सुविधा केंद्रे

येत्या ६ वर्षांत देशातील सर्वात मोठी धार्मिक नगरी अयोध्या ‘सुवर्ण अयोध्या’ म्हणून बघायला मिळणार आहे. एकसारखी घरे, एकसारखे रस्ते, इमारती-दुकानांची रंगरंगोटीही एकसमान. शेकडो हॉटेल्स-होम स्टे, सोलार सिटी, चहूबाजूंना आधुनिक महामार्ग, रिंगरोड, हवाई मार्गाने २४ तास राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संपर्क. अयोध्येतील १ लाख कोटींची ही कामे २०३१ पर्यंत पूर्ण होतील. नंतर एका दिवसात १०-१३ लाख भाविक येथे राहू शकतील. यानंतर २०४७ पर्यंत धर्मनगरीचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्याची योजना असून काम सुरू झाले आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही दरवर्षी २५ कोटी भाविकांच्या हिशेबाने नवीन अयोध्या तयार करत आहोत. २०३१ पर्यंत शरयू नदीच्या एका बाजूला वसलेल्या जुन्या अयोध्येचे नूतनीकरण केले जाणार आहे.
पहिली सौर धर्मनगरी एनटीपीसी व्यवस्थापक प्रवीण कुमार यांनी सांगितले, १६५ एकरमध्ये सोलर प्लांट उभारला जात आहे. तो रोज १०० मेगावॅट वीज निर्मती करेल. विमानतळ शहराच्या मध्यभागी १. टाउनशिप: १२०० एकरात ३० हजार लोकांसाठी नवीन आधुनिक आणि अत्यात्मिक टाऊनशिप बनत आहे. २४०० कोटींपेक्षा जास्त खर्च होईल. २. प्रत्येक प्रवेशावर टीएफसी : २०३१ पर्यंत तुम्ही अयोध्येला याल तेव्हा ज्या धर्मनगरीत प्रवेश कराल तेथे भव्य प्रवेशद्वारे असतील. प्रत्येक गेटजवळ ५.५ हेक्टरमध्ये टीएफसी (वाहतूक सुविधा केंद्र) बांधले जातील. यात ५००-१००० लोकांसाठी वसतिगृह, स्वयंपाकघर, लॉकर व पार्किंगची सुविधा असेल. ३. खोल्या : सध्या १७५ लहानमोठे हॉटेल, १०१२ होमस्टे आहेत. . यात ६ हजार खोल्या आहेत. पुढील ६ वर्षांत १०० नवे हॉटेल१ हजार धर्मशाळा, ३ हजार होमस्टे बनतील. अनेक उत्तुंग इमारती उभारल्या जातील. ४. सध्या अयोध्या शहर १०२ चौरस किमीत आहे, जे २०३१ पर्यंत ८०० चौरस किमीपर्यंत वाढेल. त्यापैकी ३२ चौरस किमी हे मूळ शहर असेल. त्यासाठी ३०० हून अधिक गावे जोडली जातील. सध्या अयोध्या विमानतळ राम मंदिरापासून सुमारे १३ किमीवर आहे, परंतु ६ वर्षांनंतर ते शहराच्या मध्यभागी दिसेल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment