मुंबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना तिथलं वातावरण आणि खेळपट्ट्या यांचा चांगलाच अंदाच असतो. त्यामुळे भारताने T 20 World cup 2022 साठी आता जेव्हा संघ निवडला त्यावर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने जोरदार टीका केली आहे. भारताकडून ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ निवडताना मोठी चूक झाली आहे, असे त्याने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांचा दाखला देत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने भारताच्या संघ निवडीवर जोरदार टीका केली आहे. जॉन्सनने यावेळी सांगितले आहे की, ” ऑस्ट्रेलियामध्ये खेळताना तुम्हाला काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. कारण भारतातील वातावरण आणि खेळपट्ट्या या ऑस्ट्रेलियासारख्या नक्कीच नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. कारण ऑस्ट्रेलियातील खेळपट्टयांवर वेगवान गोलंदाजांना चांगली साथ मिळू शकते. पण या गोष्टीचा विचार भारताने संघ निवडताना केला नाही, असे दिसत आहे.”

भारताच्या संघ निवडीवर बोट ठेवताना जॉन्सन म्हणाला की, ” जेव्हा ऑस्ट्रेलियमध्ये तुम्हा पर्थसारख्या मैदानात खेळता तेव्हा तुमच्याकडे ४ वेगवान गोलंदाज असायला हवेत, तरच तुम्हाला विजय मिळवता येऊ शकतो. ऑस्ट्रेलियात जर विजय मिळवायचे असतील तर तुम्हाला संघात २-३ फिरकी गोलंदाज घेऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला संघात ३-४ वेगवान गोलंदाज ठेवावे लागती, यामध्ये एक अष्टपैलू जो वेगवान मारा करू शकतो, असा असला तरी चालू शकते. पण ऑस्ट्रेलियात खेळताना फिरकी गोलंदाजांवर विसंबून चालणार नाही. त्यामुळे भारताने विश्वचषकासाठी संघ निवडताना मोठी चूक केली आहे, असे मला वाटते. भारताने विश्वचषकासाठी संघ निवडला खरा, पण त्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाचा विचार केला नाही. त्यामुळे ही चूक त्यांना विश्वचषकात भारी पडू शकते. त्यामुळे आता भारतीय संघ यामधून कसा मार्ग काढतो, हे पाहावे लागेल. कारण भारताने या संघात चार फिरकीपटू आणि पाच वेगवान गोलंदाज ठेवले आहेत, यामध्ये फिरकीपटूंची संख्या कमी करून वेगवान गोलंदाजांची संख्या वाढवायला हवी होती.”

टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.