तानाजी सावंत, गणेश हाकेंच्या गंभीर टीकेनंतरही अजित पवारांचे मौन:माझ्या अंगाला ** पडत नसल्याचे म्हणत उत्तर टाळले, कार्यकर्ते उत्तर देतील म्हणत इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मला उलटी होते, अशा शब्दात मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवारांसह त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी देखील अजित पवारांनी युतीतून बाहेर पडावे, म्हणत राष्ट्रवादीला डिचवले होते. मात्र, अजित पवारांनी त्याला काहीच प्रत्युत्तर दिलेले नाही. अशा कार्यकर्त्यांच्या बोलण्याने माझ्या अंगाला ** पडत नसल्याचे, अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच असे असेल तर माझे देखील खालचे कार्यकर्ते त्याला उत्तर देतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते त्या त्या मतदारसंघात मी जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार हे नागपूर येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचा जागावाटपाबाबत चर्चेची एक बैठक झाली असून पुन्हा याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. त्यानंतर चर्चा करूनच कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार असल्याचे सांगितले जाईल. ज्या दिवशी जागावाटप अंतिम होईल त्या दिवशी मस्तपैकी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. निवडणुकीमध्ये विजयी होणे हा जागा वाटपाचा एकमेव निकष असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. तानाजी सावंत यांच्या प्रश्नावर देखील त्यांनी उत्तर देणे टाळले. तर गणेश हाकेंच्या प्रश्नावर, मला कोणावरही टीका करायची नाही. मला कोणी बोलले तर माझ्या अंगाला काय ** पडत नाही. मी कामाचा माणूस आहे मी माझे माझे काम करतो. अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना चांगल्या योजना देण्याचे काम आम्ही केले असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केला आहे. आमच्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जनसन्मान यात्रा काढली असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. जागा वाटपाची चर्चा महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे. इतर पक्षातील खालचे कार्यकर्ते काही बोलत असतील तर माझे देखील खालचे कार्यकर्ते बोलू शकतात. मात्र त्या बोलण्याला काही अर्थ नसतो, मी माझे काम करत असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची गळा भेट:लोकसभेत पाडल्याचा दावा, विधानसभेत पाडण्याचाही दिला होता इशारा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांच्यात चांगलेच वितृष्ट आले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. रावसाहेब दानवे यांनी तर थेट अब्दुल सत्तार यांना विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला होता. मात्र, यानंतर आता या दोन्ही नेत्यांची छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांची गळा भेट घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्या या राज्याच्या राजकारणात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा… तरुणांच्या सर्वाधिक आत्महत्यांचा देश:केंद्रातील महाशक्ती, राज्यात खोकेशक्ती राजवटींसाठी शरमेची गोष्ट; ठाकरे गटाचा हल्लाबोल लोकसंख्येच्या वाढीपेक्षा हिंदुस्थानातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा दर अधिक असल्याचा जो ताजा अहवाल जाहीर झाला तो झोप उडवणारा आहे. विद्यार्थी मृत्यूला कवटाळून काळझोप का घेत आहेत याची चिंता कोणी करणार आहे काय? पुन्हा महाराष्ट्रासारखे देशातील सर्वात प्रगतशील राज्य आत्महत्यांच्या बाबतीत आघाडीवर असेल तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उद्धव ठाकरे गटाने विचारला आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ठाकरे गटाने राज्य तसेच केंद्र सरकारवर टीका केली आहे. हिंदुस्थान लवकरच जागतिक महासत्ता होणार, आर्थिक महासत्ता होणार, अशा बाता राज्यकर्ते कायम मारत असतात. ही महासत्ता होईल तेव्हा होवो, मात्र ‘तरुण आत्महत्यांची महासत्ता’ हा कलंक त्याआधी पुसायला हवा, अशा शब्दात ठाकरे गटाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा… पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार:विदर्भ, मराठवाडा आदी भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता वाढली आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश भागात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान राज्यातील विदर्भ, मराठवाडा आदी भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकटांसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…