उस्मानाबाद : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी त्यांच्या कृतीतून इतर राजकारण्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. तानाजी सावंत ४ मुलांचं पालकत्व स्वीकारत ते मामा बनले आहेत. घरातील कर्ता अचानक देवा घरी गेल्या नंतर उघडयावर पडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचं काम सावंत यांनी केलं आहे. त्या कुटुंबातील ४ मुलींची शिक्षणाची, लग्नाची जबाबदारी मामा म्हणून त्यांनी स्वीकारली आहे. तानाजी सावंत यांनी संकट काळात आधार दिल्यानं मुलीच्या आईचे अश्रू अनावर झाले.

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी नागेश सुरवसे यांचा काम करत असताना पाय घसरून शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. या नंतर सुरवसे कुटुंब उघडयावर आले होते. कुटुंबात ४ मुली असल्याने त्यांचे शिक्षण लग्न व भविष्याची चिंता या मुलींच्या आईला होती. या संकट समयी आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी या कुटुंबाचे पालकत्व घेत जबाबदारी स्वीकारली आहे. या चार मुली माझ्या भाच्या असून त्यांची मी जबाबदारी घेतो असे सांगत तानाजी सावंत यांनी सुरवसे कुटुंबीयांना आधार दिला.

मंत्र्यांच्या तालुक्यात रस्ता नाही, सगळा चिखल, महिलेचा मृतदेह बैलगाडीतून नेण्याची वेळ

मनीषाताई आपण आता यापुढे काळजी करू नका, असे सांगत तानाजी सावंत यांनी या कुंटुंबाला धीर दिला. सुरवसे कुटुंबीय हे उस्मानाबादमध्ये रामनगर येथे राहत होते. त्यांची हि व्यथा सनी पवार या सामाजिक कार्यकर्त्यानं आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडे मांडली.

मुकेश अंबानींच्या विहीणबाईंचा बोलबाला, फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान!

तानाजी सावंत यांनी तात्काळ सुरवसे कुटुंबीयाची भेट घेत सांत्वन केले आणि चार मुलींचं पालकत्क स्वीकारत असल्याचं सांगितलं. याप्रसंगी धनंजय सावंत, केशव सावंत, डॉ तानाजी सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, दत्ता साळुंके, जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके,धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख अजित लाकाळ यासह पदाधिकारी उपस्थित होते. आरोग्यमंत्री डॉ . तानाजी सावंत यांनी यापूर्वी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कै. दिलीप जावळे कुटुंबाचे पालकत्व स्वीकारत १० लाखांची मदत केली होती तसेच दोन्ही मुलांच्या शिक्षण व नोकरीची जबाबदारी घेतली होती.

‘क्षमा करायला हवी’ म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेकडून प्रत्युत्तर, म्हणतात, ‘कटकारस्थान रचून…’

आम्ही ३५ वर्ष जनतेची कामं केली, आम्हाला पैसे देऊन सभेला माणसं आणण्याची गरज नाही | संदिपान भुमरेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.