…तर, आम्हाला तुतारी वाजवायला वेळ लागणार नाही:रामराजे निंबाळकरांचा भाजपला इशारा; युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर
भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्यांच्या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशारा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक-निंबाळकरांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. राज्यात महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. महायुतीत गेल्यानंतर मुस्लिम मतदार दुरावला असल्यानं राष्ट्रवादीतील अनेक नेते पुन्हा शरद पवारांच्या संपर्कात जात आहेत. साताऱ्यातील फलटणमध्ये विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भुमिकेवर हल्लाबोल करत तुतारी फुंकण्याचे संकेत दिले. महायुतीत भाजपकडे असलेल्या माढा मतदार संघातील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला रामराजेंनी कडाडून विरोध केला होता. प्रत्यक्ष निवडणुकीत देखील रामराजेंच्या गटाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील यांचेच काम केले. धैर्यशील मोहिते-पाटील विजयी झाल्यानंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी आता रामराजेंच्या निवटवर्तीयांची फोडाफोडी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी (२ सप्टेंबर) फलटण दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी फलटणमध्ये झालेल्या बैठकीत रामराजे नाईक-निंबाळकरांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकरांविषयी तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. आपलं भांडण भाजपासोबत नाही. माजी खासदारासोबत आहे. ते आणि त्यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत. त्याला सपोर्ट करू नका. अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे, असा थेट इशाराच रामराजे नाईक निंबाळकरांनी दिला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजकर्ण केले:आज त्यांचे ‘गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले’ म्हणत उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल फडणवीस व त्यांच्या मिंधे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली. एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले. त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या अडचणीत वाढ:शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट विरोधातील याचिकेवर 5 ऑक्टोबरला सुनावणी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात देणाऱ्या क्लीन चिट देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25 हजार कोटी रुपयांच्या या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये यासंबंधी अजित पवार यांना क्लीन चिट देत पहिल्यांदाच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. आता या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी होणार आहे. पूर्ण बातमी वाचा…