लडाखमध्ये ताऱ्यांचा मेळा! देशातील प्रथम ‘डार्क नाइट’ सफारी:लेहपासून 300 किमी दूर हनले येथे 14 हजार फूट उंचीवर -21 अंश तापमानात टिपलेले अद्भुत दृश्य
उघड्या डोळ्यांनी असंख्य तारे, ग्रह, अवकाशातील दृश्ये… शहरात हे शक्य नाही. पण, देशातील पहिल्या डार्क नाइट सफारीत ते शक्य झालेे. हनले येथे बनवलेल्या या सफारीला ‘विंडो ऑफ स्पेस’ असेही म्हटले जातेय. त्याची चाचणी सुरू आहे. अनौपचारिक उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते प्रस्तावित आहे. १४ हजार फूट उंचीवर आकाशगंगा उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसते. गावातील लोकांना दिलेल्या दुर्बिणींमुळे हनले येथील २२ चौ.कि.मी. परिसराला खगोल पर्यटन केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. येथे आशियातील सर्वात मोठा २१ मी. व्यासाचा गॅमा-रे टेलिस्कोप बसवला आहे. जो जगातील सर्वात उंचावर आहे. लेह ते हनले या ३०० किमी प्रवासातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे ब्लॅक आइस. येथे गाडी घसरते व चाकांना साखळी लावावी लागते. येथे मार्च ते सप्टेंबर हा काळ पर्यटनासाठी अनुकूल आहे. खगोल पर्यटनामुळे हनलेचे जीवन बदलले, १०वी पास कमावताहेत ५-१० लाख रुपये ग्रामस्थ बनले खगोल दूत… हनलेत येणाऱ्या २२ गावांतील २५ रहिवाशांना ॲस्ट्रो ॲम्बेसेडर बनवले गेले. उद्देश- देशभरातून आणि जगभरातून पर्यटक येतील. येथे मुक्काम करून दुर्बिणीद्वारे तारे, ग्रह, आकाशगंगा आणि इतर आकाशगंगा पाहू शकतील. त्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना अडीच ते तीन लाख रुपये मिळतात. दुर्बिणी देण्यात आल्या आहेत. यातील बहुतांश मजुरी करत होते. आता प्रशिक्षण आणि दुर्बिणीच्या मदतीने ते वर्षाला ५ ते १० लाख रुपये कमावतील. घरांचे होम स्टेमध्ये रूपांतर झाले आहे. जेथे हनले ॲस्ट्रो टुरिझम हब तयार होत आहे. २२ चौरस किमीत ३५०-४०० घरे आहेत. ६ गावांत एकूण १० दुकाने आहेत. लोक माल लेहहून आणून २-३ महिन्यांचा साठा करतात. ग्रामस्थांना दिले विशेष दिवे आणि पडदे; कारचे लाइटही लावू शकत नाही रात्री ८ नंतर गावातील वीज बंद… प्रकल्पाचे प्रभारी मुख्य अभियंता अंगचुक दोर्जे सांगतात – ॲस्ट्रो टुरिझमसाठी प्रकाश प्रदूषण होऊ नये हे महत्त्वाचे आहे. गावातील घरांमध्ये खास पडदे आणि लो-केल्विन एलईडी दिवे मोफत दिले आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेतच सौरऊर्जेद्वारे वीज दिली जाते. त्यानंतर घरांची वीज बंद केली जाते. केवळ हनलेच का? अंधार कायम, तरच प्रकल्प यशस्वी… लडाखमधील हनलेचे हे छायाचित्र भास्करच्या छायाचित्रकाराने रात्री २ वा. कॅमेऱ्यात कैद केले. यासाठी त्याला उणे २१ अंशात ३ तास उघड्यावर थांबावे लागले. याआधी, ते लेहमध्ये -५ अंशांमध्ये ३ दिवस राहिले, जेणेकरून तापमानाशी जुळवून घेऊ शकतील. नंतर ३०० किमी प्रवास करून हनलेला पोहोचले. तेव्हा हवामान बघडले. ४८ तासांच्या प्रतीक्षेनंतर हे चित्र क्लिक झाले. २२ किमीवरच कारचे हेडलाइट बंद हनलेच्या आधी २२ किमीवर एक पोस्ट उभारत आहेत. कारचे हेडलाइट बंद केल्यावरच पर्यटकांची वाहने येथून पुढे जातील. प्रत्येक ८-८ मी. वरील रोड रिफ्लेक्टर पुढचा मार्ग निश्चितीस मदत करतील.