जमशेदपूर : हल्ली कुठेही गेलं तरी OYO च्या माध्यमातून सहज राहण्याची सोय होते. पण यातूनच एका तरुणाला असा काही अनुभव आला की ही घटना वाचून तुम्ही हादराल. एका तरुणाने OYO रुम बूक केली आणि खोलीत जाताच त्याला धक्का बसला. त्याने खोलीत असं काही पाहिलं की यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण लॉजच्या खोलीत जाताच त्याला बेडखाली २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. झारखंडमधील जमशेदपूर येथील आदित्यपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आरआयटी मोर इथे हा लॉज असून त्याचे नाव शुभेक्षा लॉज आहे. लॉजच्या १०१ क्रमांकाच्या खोलीतून महिलेचा मृतदेह सापडला.

भरधाव ट्रकने केला मोठा घात, फुटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं; चौघांनी गमावले प्राण
या घटनेची माहिती मिळताच आदित्यपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. मृत तरुणी जमशेदपूर इथल्या गलुडीह येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

कांती देवी असं या मुलीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लॉज ओयोद्वारे चालवले जाते. ही तरुणी कोलकाता येथील एका तरुणासोबत इथे आली होती. घटनेनंतर तरुण घटनास्थळावरून फरार झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक गुन्हेगारी वस्तू जप्त केल्या असून याबाबत हॉटेलचे व्यवस्थापक दिलीप घोष यांनी सीसीटीव्हीचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.

मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार, दोघेही दुपारी रुम घेण्यासाठी आले होते, काही वेळाने मुलगा जेवण आणण्यासाठी गेला आणि परत न येताच हॉटेलमधून पळून गेला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून तरुणाचा शोध घेत आहेत.

Weather Alert : महाराष्ट्रावर पुढचे ३-४ दिवस अस्मानी संकट, ‘या’ भागांना पावसाचा यलो अलर्टSource link

Leave a Reply

Your email address will not be published.