[ad_1]

मुंबई : टाटा मोटर्स लिमिटेडने शुक्रवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. टाटा मोटर्स लिमिटेडने डिसेंबर तिमाहीत १३३.३२ टक्क्यांचा निव्वळ नफा ७,१०० कोटी रुपये नोंदवला तर, मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने ३,०४३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. कंपनीने एका निवेदनात म्हटले की, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महसूल वार्षिक २५% वाढून १,१०,६०० कोटी रुपये झाला आहे.

आरबीआयचे निर्बंध,शेअर्समध्ये सातत्यानं घसरण; पेटीएमसाठी मोठी अपडेट, बड्या कंपनीकडून २४४ कोटींची गुंतवणूक
कंपनीने काय म्हटले?
टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही तिन्ही वाहन व्यवसायांवर सकारात्मक आहोत. नवीन लाँच आणि जेएलआरमधील पुरवठ्यात सुधारणा यामुळे आम्हाला चौथ्या तिमाहीत (मार्च तिमाही) कामगिरी आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे. आम्ही ९,५०० रुपयांची निव्वळ कर्ज कपात केली आहे. कोटी आहे आणि आम्ही कंपनीला कर्जमुक्त करू असा विश्वास आहे.’

टाटा मोटर्स समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी पीबी बालाजी म्हणाले, ‘आम्ही वर्षाची समाप्ती मजबूत स्थितीत करण्याचे आमचे ध्येय आहे आणि येत्या तिमाहीत आमची कामगिरी कायम ठेवण्याचा आम्हाला विश्वास आहे.’

कोण होणार जगातील पहिला ट्रिलियनेअर? पाच उद्योजक रेसमध्ये, भारतीय बिझनेसमनचे नावही चर्चेत
कंपनीच्या शेअर्सची स्थिती
टाटा मोटर्सचा शेअर शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी ८८२.८० रुपयांवर बंद झाला असून तर गुरुवारी, बाजाराच्या अस्थिरतेत टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये किंचित कमजोरी नोंदवली गेली. याशिवाय शेअरच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर एका महिन्यात शेअरने १३ टक्क्यांनी आणि YTD मध्ये ११ टक्क्यांनी वधारला असून गेल्या सहा महिन्यांत शेअरची किंमत ४३ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच गेल्या एका वर्षात जवळपास हा शेअर १०० टक्क्यांनी वाढला असून गेल्या पाच वर्षांत ४८० टक्क्यांनी उसळला आहे. शेअरची ५२ आठवड्यांची उच्च किंमत ९०१.९० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४००.४० रुपये आहे.

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली, निवडणुकीआधी सरकार करू शकते मोठी घोषणा; DA इतका वाढणार
टाटा मोटर्सचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) २,९२,०११.८० कोटी रुपये असून ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने टाटा मोटर्सच्या शेअर्सची किंमत ९२५ रुपये निर्धारित केली आहे आणि त्यावर आपले खरेदी रेटिंग दिले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सने मार्केट कॅपच्या बाबतीत मारुती सुझुकीला मागे टाकत देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीचा मान पटकावला. तर गेल्या वर्षी टाटा मोटर्सने बंपर परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

Read Latest Business News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *