टाटांच्या शेअरचे मल्टीबॅगर रिटर्न्स
टाटा समूहाची कंपनी ट्रेंट लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या १० महिन्यांत झपाट्याने वाढ झाली असून ट्रेंट शेअर्सची किंमत दुप्पटीचे वाढली आहे. २७ जानेवारी २०२३ रोजी टाटा ग्रुप कंपनी ट्रेंटचे शेअर्स ११७६.७० रुपयांच्या पातळीवर होते, तर ८ नोव्हेंबर रोजी ट्रेंटचे शेअर्स २४४६.३० रुपयांवर बंद झाले. अशा प्रकाराने गेल्या १० महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये १०८ टक्क्यांची वाढ झाली असून शेअरने बुधवारी २५०४.९५ रुपयांच्या नव्या उच्चांकावर उडी घेतली. दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनीही या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.
दमानी यांच्याकडे ५४ लाखांहून अधिक शेअर्स
दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्याकडे ट्रेंट लिमिटेडचे ५,४२,११,३१ शेअर्स (१.५२%) असून दमानींच्या ट्रेंटमधील भागभांडवलाचे सध्याचे मूल्य सुमारे १३३० कोटी रुपये आहे. दमाणी यांची ट्रेंट लिमिटेडमधील भागीदारी त्यांच्या डेरिव्ह ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या गुंतवणूक कंपनीमार्फत आहे. जर आपण गेल्या ९ तिमाहींच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोललो, तर दमानी यांनी ट्रेंट लिमिटेडमधील त्यांच्या भागभांडवलात कोणताही बदल केलेला नाही.
पाच वर्षात ६४७ टक्क्यांची उसळी
ट्रेंट लिमिटेडचे शेअर्स गेल्या पाच वर्षात ६४७ टक्क्यांनी वाढले आहेत. ट्रेंटचे शेअर्स ९ नोव्हेंबर २०१८ रोजी ३२७.५० रुपयांवर होते तर ८ नोव्हेंबर २०२३ रोजी टाटा ग्रुप कंपनीचे शेअर्स २,४४६.३० रुपयांवर बंद झाले. तसेच गेल्या १० वर्षात ट्रेंट लिमिटेडचे शेअर्स २,५५५ टक्क्यांनी तेजीने चढले. ट्रेंटचा शेअर ८ नोव्हेंबर २०२३ रोजी ९२.०९ रुपयांवर होता, जो २४४६.३० रुपयांवर पोहोचला.
ट्रेंटला २८९ कोटी रुपयांचा नफा
ट्रेंट लिमिटेडने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत २८९.६ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला असून कंपनीच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५५.९% वाढ झाली आहे. ट्रेंट लिमिटेडने गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत १८६ कोटी रुपयांचा नफा कमावला तर जुलै-सप्टेंबर २०२३ तिमाहीत कंपनीचा महसूल २८९१ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या सप्टेंबर तिमाहीत १८४१ कोटी रुपये होता.
(Disclaimer: स्टॉकच्या कामगिरीबद्दल येथे दिलेला तपशील केवळ माहिती हेतू आहे, खरेदीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुम्हाला होणार्या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन जबाबदार राहणार नाही.)