टाटांच्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती
टाटा टेक्नॉलॉजीज ही एक आघाडीची जागतिक अभियांत्रिकी सेवा कंपनी असून जागतिक स्तरावर मूळ साधन उत्पादकांना (OEMs) उत्पादन विकास आणि डिजिटल उपाय प्रदान करते. तसेच कंपनी संकल्पना डिझाइन, टीअर-डाउन आणि बेंचमार्किंग, वाहन आर्किटेक्चर, बॉडी आणि चेसिस इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम आणि डायग्नोस्टिक्स इत्यादी सेवा उपलब्ध करून देते. तर कंपनीची जागतिक स्तरावर १८ वितरण केंद्रे आहेत, जिथे ११,००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्यासाठी जाणून घेण्यासाठी महत्वाचे मुद्दे-
– IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल म्हणजे त्यातील संपूर्ण रक्कम प्रवर्तक टाटा मोटर्ससह विक्री करणाऱ्या भागधारकांना जाईल.
– OFS अंतर्गत टाटा मोटर्स ४.६२ कोटी शेअर्स, अल्फा TC होल्डिंग्स ९७.१ लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ४८ लाख शेअर्सची विक्री करेल.
– टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओच्या इश्यूचा आकार आधीच्या ९.५७ कोटी शेअर्सवरून ६.०८ कोटी इक्विटी शेअर्सवर कमी करण्यात आला आहे.
कंपनीने या वर्षी मार्चमध्ये सेबीकडे आपली कागदपत्रे दाखल केली होती आणि जूनमध्ये नियामकाकडून मंजुरी देण्यात आली.
– इश्यूमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजने टाटा मोटर्सच्या पात्र भागधारकांसाठी १०% कोटा राखून ठेवला आहे.
– ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ३४०-३४५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेंड करत आहेत.
– टाटा मोटर्सच्या संपादन खर्चाची भारित सरासरी ७.४० रुपये/शेअर असून कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुद्यानुसार, अल्फा टीसी होल्डिंग्ज आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड I या गुंतवणूकदारांसाठी ते २५.१० रुपये आहे.
– टाटा टेकचे अंतिम मूल्य सुमारे २ अब्ज डॉलर (रु. १६,३०० कोटी) होते, जेव्हा TPG क्लायमेटने कंपनीतील सुमारे ९% हिस्सा विकत घेतला होता.
– JM फायनान्शियल, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया आणि BofA सिक्युरिटीज इंडिया हे आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर असून रजिस्ट्रारचे नाव लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे.
– डिसेंबर २०२२ मध्ये संपलेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीने १५% वार्षिक (YoY) महसुलात ३,०५२ कोटी रुपयांची कमाई केली तर एकूण महसुलात सेवा क्षेत्राच्या महसुलाचे योगदान ८८% होते. याच कालावधीत कंपनीने ४०७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला असून आर्थिक वर्ष २०२१-२३ मध्ये कंपनीच्या महसुलात ३० टक्क्यांच्या CAGR ने वाढ झाली, ज्यामुळे EBITDA CAGR ४६% झाला. याच कालावधीसाठी PAT ६१.५ टक्क्यांच्या CAGR ने वाढला.