टाटा मोटर्स शेअरचा विक्रमी उच्चांक
शेअर बाजारातील आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी म्हणजे शुक्रवारी, टाटा मोटर्सच्या शेअरनी जोरदार मुसंडी मारली आणि विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीचा स्टॉक १.०९ टक्के उडी घेत ६८१.२५ रुपयांवर बंद झाला, तर दिवसभराच्या व्यवहारात शेअरने ६८७.६५ रुपयांचा उच्चांक गाठला. अशा परिस्थितीत शेअरने २०२० पासून सुमारे ९८१ टक्क्यांनी वधारला आहे. २४ मार्च २०२० रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत ६३.६० रुपयांवर होती.
यादरम्यान, वर्षभरात टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ६२% वाढ झाली असून २०२३ शेअर खरेदी करून गुंतवणूक कायम ठेवलेल्या लोकांना आत्तापर्यंत ७३.७० टक्के परतावा मिळाला आहे. याशिवाय बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, येस सिक्युरिटीज ब्रोकरेजने येत्या काळात शेअरवर ७७३ रुपयांच्या पातळीवर मुसंडी मारण्याचा अंदाज वर्तवला आहे.
टाटा मोटर्सच्या शेअरमधील तेजीचे कारण काय?
टाटांच्या ऑटो कंपनीच्या शेअर्समधील तुफान तेजीचे कारण म्हणजे टाटा टेक्नॉलॉजीजचा आयपीओ मानला जात आहे. तब्बल दोन दशकानंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ येत असून रिटेल गुंतवणूकदारांना २२ ते २४ दरम्यान, या आयपीओ अंतर्गत शेअर्स खरेदीसाठी बोली लावण्याची संधी दिली जाईल. टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओसाठी बँड ४७५-५०० रुपयांदरम्यान निश्चित केली आहे.
Read Latest Business News
(Disclaimer: इथे देण्यात आलेला तपशील केवळ माहितीसाठी आहे, हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.