नवी दिल्ली: Redmi Earbuds 3 Pro Offers: Redmi चा फेस्टिव्ह सेल सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळेच कंपनी विक्रीपूर्वीच आपल्या उत्पादनांवर मिळालेल्या ऑफर्सचा खुलासा करत आहे. अशात, जर तुम्ही इअरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर रेडमीची ही डील तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. #DiwaliWithMi सेलमध्ये Redmi मागील वर्षी लाँच केलेल्या Redmi Earbuds 3 Pro वर उत्तम सूट देत आहे. नवीन बड्स खरेदी करायचे असतील तर या ऑफरबद्दल जाणून घ्या.

वाचा: खूपच धोकादायक आहे ‘हे’ Mobile Apps, जॅकलिनप्रमाणे तुमचीही होऊ शकते फसवणूक, पाहा डिटेल्स

Redmi ने ४५०० रुपयांमध्ये चांगल्या दर्जाचे साउंड क्वालिटी ऑफर करणारे Earbuds 3 Pro लाँच केले. आता दिवाळी सेलमध्ये कंपनी प्रथमच हे स्पेशल बड्स १४९९ रुपयांना विकत आहे. लक्षात ठेवा, Earbuds 3 Pro १९ सप्टेंबरपासून विक्री सवलतीसह विकला जाईल. जर तुम्हाला हे बड्स विकत घ्यायचे असतील, तर तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन “Notify Me” हा पर्याय निवडून सेल सुरू झाल्यावर सूचना मिळवू शकता.

वाचा: महिनाभराच्या व्हॅलिडीटीसह येणारे Reliance Jio , Airtel, Vi चे टॉप प्लान्स एकदा पाहाच

Redmi Earbuds 3 Pro ची वैशिष्ट्ये:

Redmi Earbuds 3 Pro मध्ये ड्युअल डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आला आहे. यात Qualcomm चा QCC3040 प्रोसेसर आहे. aptX अडॅप्टिव्ह कोडेकसाठी समर्थन असलेले ब्लूटूथ v5.2 आहे. यासह, कमी लेट्सन्सी देखील आहे. यात नियंत्रणासाठी स्पर्शासाठी सपोर्ट देखील आहे. या व्यतिरिक्त, Redmi Earbuds 3 Pro मध्ये इन्फ्रारेड (IR) सेन्सर्स आहेत. जे कानातले डिटेक्शन सक्षम करतात. जे इअरपीस काढल्यावर आपोआप संगीत थांबवतात. प्रत्येक इयरबडमध्ये 43 mAh लिथियम-आयन बॅटरी आहे. तर, केस ६०० mAh बॅटरी पॅक करते. चार्जिंगसाठी एक टाइप-सी पोर्ट आहे आणि ३० तास बॅटरी बॅकअप आहे.

वाचा: Microsoft युजर्स व्हा अलर्ट ! सरकारने दिला ‘हा’ इशारा, दुर्लक्ष केल्यास मोजावी लागेल मोठी किंमतSource link

Leave a Reply

Your email address will not be published.