कोलंबो: आशिया कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेनं शेवटच्या चेंडूवर विजय खेचून आणला. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे त्यांनी २ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानला आशिया कपमधून बाहेर पडावं लागलं. पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. यानंतर आता पाकिस्तानच्या संघात सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. ड्रेसिंग रुममध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये वाद झाले.बोल न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज यांच्यात भांडण झालं. हा वाद शांत करण्यासाठी रिझवानला मध्यस्थी करावी लागली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा निसटता पराभव झाला. या विजयामुळे श्रीलंकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला. तर पाकिस्तानचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. सामन्यानंतर कर्णधार बाबर आझमनं खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये बोलावलं. संघातील खेळाडूंच्या वाईट कामगिरीबद्दल बाबर बोलत होता. तितक्यात आफ्रिदीनं त्याला रोखलं. ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय, किमान त्यांचं तरी कौतुक करा, असं आफ्रिदी म्हणाला. आफ्रिदीचं बोलणं बाबरला खटकलं. कोणी चांगली कामगिरी केली ते मला माहीत आहे, असं म्हणत बाबर आफ्रिदीवर संतापला.शाहिन आफ्रिदी आणि बाबर आझम यांच्यातला वाद वाढत गेला. परिस्थिती निवळण्यासाठी अखेर यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवाननं मध्यस्थी केली. त्यानं वादात पडत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जबाबदारी ओळखून खेळत नाही, असं बाबर संघातील खेळाडूंना म्हणाला. ही बाब आफ्रिदीला खटकली आणि त्यानं बाबरला मध्येच रोखलं. याचवरुन दोघांमध्ये वाकयुद्ध रंगलं.आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पाकिस्तानचा संघ तळाला राहिला. सुपर फोरमध्ये पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी बांगलादेशचा पराभव केला होता. पण त्यानंतर भारतानं त्यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानची गोलंदाजी आणि फलंदाजी या सामन्यात पूर्णत: अपयशी ठरली. या दारुण पराभवाचा परिणाम पुढच्याच सामन्यात दिसला. श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी पाकिस्तानला होती. पण अटीतटीच्या लढतीत त्यांच्याकडून चुका झाल्या. त्यामुळे त्यांना शेवटच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *