अकोला: शेती व्यवसायात कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्यासाठी आजच्या काळात शेतकऱ्यांकडून नव-नवे प्रयोग सुरू आहेत. परंतू आज आपण अनेकदा ऐकले असेल की शेतकऱ्यांना फळबागेतून मिळणारे उत्पन्न घटत आहे. अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील देगांव परिसरात एका शिक्षकाने आपल्या शेतात नवीन प्रयोग केला आहे. सात एकरावर लावलेल्या फळबागेतून ते लाखोंचे उत्पन्न घेत आहे. अनिल भिरडे या प्रयोगशील शिक्षक शेतकऱ्याची ही प्रेरणादायी यशोगाथा.
तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न
विदर्भातील अमरावती, नागपुरसह अन्य भाग हा ऑरेंज सिटी म्हणून ओळखला जातो. तर अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील वाडेगाव परिसर हा निंबूवर्गीय म्हणून ओळख आहे. त्यात तालुक्यात पहिल्यांदाच अरुण वासुदेव भिरडे या ४६ वर्षीय शिक्षकाने आपल्या शेतात संत्रा फळबाग फुलवलीत नवा विक्रम उभा केला. विशेष म्हणजे त्यांना या पिकाबद्दल फारशी माहिती नव्हती, तसेच कोणत्याही प्रकारचे खास प्रशिक्षणही त्यांनी घेतलेले नाही. त्यामुळे त्यांनी यूट्युबवरून सोबतच कृषी विभागाकडून धडे घेत या संत्राची यशस्वी लागवड केली.

अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील सर्वात मोठं गाव असलेले वाडेगाव आणि जवळपास असलेला परिसर आज लिंबू उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध असून येथील लिंबू देशभरात प्रसिद्ध आहे. याच वाडेगाव परिसरातील देगांवात राहणाऱ्या अरुण वासुदेव भिरडे या शिक्षकांनं आपल्या शेतात केलेल्या भन्नाट प्रयोगाने तालुक्यात चांगलेचं चर्चेत आले आहे. या चर्चेचं कारण ठरलंय त्यांनी शेतात उभरलेली संत्रा फळबाग. अनिल भिरडे यांच्याकडे वडीलोपार्जित १६ एकर शेती आहे. वडील वासुदेव यांचं १९९० मध्ये निधन झालं. कुटुंबाची सर्व जबाबदारी मोठा भाऊ संतोष यांच्या खांद्यावर आली. संतोष यांनी सुरुवातीला दोन ते तीन वर्ष शेतीचा करून कुटुंब सांभाळलं.

दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्याने दोन एकर लिंबाची बाग पेटवली

त्यानंतर पशु दवाखान्यात त्यांना नोकरी लागली. त्यावेळी शेतात पारंपरिक पिके घ्यायचे. १९९८ मध्ये अनिल भिरडे हे शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेवर नोकरीवर लागले. दोघा भावांनी नोकरी करून शेतीमध्ये पारंपरिक पिके न घेता नवीन काहीतरी लागवड करावा, असा विचार सुरू केला. सुरुवातीला त्यांनी लिंबू लागवड केली आणि त्यातून त्यांना उत्पन्न मिळू लागले. कधीकाळी निंबू पिकातून हवं तसं उत्पन्न मिळत नव्हतं. यासाठी अनिल भिरडे यांनी अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाला भेट दिली. येथील शास्त्रज्ञ दिनेश पैठनकर, योगेश इंगळे यांच्याशी चर्चा केली. शेतातील मातीची तपासणी करून त्यांनी संत्रा पिकासाठी त्यांना प्रोत्साहन केलं.

मोठ्या भावाच्या मदतीने अनिल भिडे यांनी २००६ मध्ये शेतात तीन एकरावर संत्रा लागवड केला. २०१५ पासून त्यांना संत्रा पिकातून चांगलं उत्पन्न हाती येऊ लागले. पुढे २०१६ पासून त्यांनी आणखी साडेतीन एकरावर संत्रा फळबाग़ वाढवली. यासाठी त्यांनी शासकीय योजनेचा पुरेपूर वापर केला. शासकीय योजनेच्या पाठबळामुळे आज त्यांनी अतिशय कमी खर्चात संत्रा फळबाग यशस्वी केली. बाळापुर तालुक्यात अनिल भिडे हे पहिलेच संत्रा उत्पादक शेतकरी ठरले आहेत. संत्रा झाडांची त्यांनी वेळोवेळी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनानुसार काळजी घेतली आणि त्यातून त्यांना लाखोंचे उत्पन्न होते आहे.

संत्रा झाडांतून वर्षातून दोन वेळा मृग आणि आंबिया बारमधून उत्पन्न हाती येते. मृग बारमधून सर्वात जास्त उप्तन्न मिळते. या काळात नुसता नफाच. या दरम्यान संत्र्याला भाव अधिक मिळत असून एका कॅरेट्ला ६०० ते ६५० रूपयांपर्यत भाव जातो, तर आंबिया बारमध्ये ३०० पासून ४०० रूपयांमध्ये विक्री होते. सुरुवातीला मृग’मधून १६०० कॅरेट्स इतका संत्रा आला असून पाच लाख रूपयांचं उत्पन्न मिळालं. दुसऱ्या बारमध्ये ६ लाखांचं. तर आंबिया बारमधून चार लाखांचा संत्रां झाला. सद्यस्थितीत आंबियाचा मौसम सुरू असून त्यांना यातून चांगलं उत्पन्न होत आहे.
चिमुकला शेतकरी पुत्र! थकलेल्या पित्याला पाहून जीव व्याकूळ; फवारणी पंप स्वत:च्या पाठीवर घेतलं अन्…
‘मृग’ सुरुवात जून महिन्यात होत असून तोडणीला फेब्रुवारीला येतात. तर आंबिया मौसम हा जानेवारी प्रारंभ होत असून तोडणी ऑक्टोंबर आणि सप्टेंबरपर्यत राहतो. विशेष म्हणजे, भिरडेंनी आता ७ एकरावर क्षेत्रपळ वाढल्यामूळे पुढील हंगामात १३ ते १४ लाख रूपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. दरम्यान त्यांच्या संत्राला आज बाजारात चांगली मागणी आहे, पातुरचा व्यापारी वर्ग जागेवरच त्यांचा शेतमाल खरेदी करतो. मागील काळात अतिवृष्टीच्या फटक्यामुळे संत्रा बागेचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी संत्रा बागेत आंतरपीक म्हणून सोयाबीन, कांदा, मिरची सारखे पिके घेतले.

भिरडे यांच्या एकत्रित कुटुंबामुळे हे सर्व काही शक्य झालं, आज या फळबागेतून त्यांनी अनेकांना रोजगार दिला असून संत्राची देखरेख करण्यासाठी कायम एकाला रोजगार दिला. इच्छाशक्ती, कष्ट यांना योग्य व्यवस्थापनाची जोड दिल्यास हमखास यश मिळते, हे शिक्षक अनिल आणि संतोष या दोघा भावांनी दाखवून दिले. इतकचं नव्हे तर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आता चांगलीच बदललेली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *