विशाखापट्टणम : टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मुंबईतील विजयासह सुरुवात केली होती. मुंबईतून सुरु झालेला विजयाचा प्रवास कायम ठेवण्यात टीम इंडियाला अपयश आलं आहे. टीम इंडियानं आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढं शरणागती पत्करली. रोहित शर्मानं आजच्या सामन्यात पुनरागमन केलं होतं. मात्र, आस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श यांच्या वादळा पुढं टीम इंडियाची दाणादाण उडाली. ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला ११७ धावांवर रोखलं त्यानंतर त्यांच्या सलामीच्या जोडीनं ११ ओव्हरमध्ये १२१ धावा करत टीम इंडियाला धूळ चारली.

मिचेल स्टार्कचं वादळ

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना मिचेल स्टार्क, सेन अबोट, नॅथन एलिस यांनी भारताचा डाव ११७ धावांमध्ये गुंडाळला. मिचेल स्टार्कनं भारताच्या ५ विकेट घेतल्या. सेन अबोटनं ३ विकेट तर नॅथन एलिसनं दोन विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कनं रोहित शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल आणि मोहम्मद सिराजला बाद केलं. मिचेल स्टार्कनं टीम इंडियाची आघाडीची फळी बाद केली.

मानहानीकारक पराभवानंतर भारताला अजून एक मोठा धक्का, पाहा नेमकं घडलं तरी काय

अजित पवारांनी भाषणात सुप्रीम कोर्टाचं नाव काढताच माईकच बंद पडला

मिचेल मार्शचं वादळ

भारतानं दिलेलं ११७ धावाचं आव्हान घेऊन ऑस्ट्रेलियाची ट्रॅविस हेड आणि मिचेल मार्शची जोडी मैदानात उतरली होती. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या जोडीनं भारताच्या गोलदाजांची धुलाई केली. ११७ धावांचं आव्हान त्यांनी अवघ्या ११ ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मिचेल स्टार्कनं ६ षटकार आणि ६ चौकार लगावत ६६ धावांची खेळी ३६ बॉलमध्ये केली. तर, ट्रॅविस हेडनं १० चौकारांसह ५१ धावा केल्या.

जिना मरना साथ हैं! कामावरुन परताना भंयकर अपघात, जिवलग मित्रांनी एकत्र जग सोडलं

टीम इंडियाच्या फलंदांजांची निराशाजनक कामगिरी

ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं. टीम इंडियाला पहिल्या ओव्हरमध्ये धक्का बसला. मिचेल स्टार्कनं शुभमन गिल शुन्यावर बाद झाला. त्यापाठोपाठ टीम इंडियाच्या विकेटची मालिका सुरु झाली. रोहित शर्मा १३ धावा, विराट कोहली ३१ धावा, सूर्यकुमार यादव देखील शुन्यावर बाद झाला. के.एल. राहुलनं ९ धावा केल्या तर हार्दिक पांड्या एक रनवर आऊट झाला. रवींद्र जडेजानं १६ तर अक्षर पटेलनं २९ धावा केल्या. कुलदीप यादव ४ धावांवर बाद झाला. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज देखील शुन्यावर बाद झाला.

नेहरुंनी देशासाठी कोणतंच काम केलं नाही, जातीपातीमुळे महाराष्ट्र विकासात मागे: चंद्रकांत पाटील



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *