[ad_1]

नवी दिल्ली: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. या शानदार कामगिरीसह टीम इंडिया आज १९ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध वनडे विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या विश्वचषकात टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने आपल्या शानदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, तर दुसरीकडे भारतीय संघातील खेळाडूंच्या मनगटावर बांधलेल्या उपकरणाने लक्ष वेधून घेतले आहे.

खरं तर, प्रत्येक सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू मनगटावर स्मार्टवॉचसारखे डिव्हाईस घालून मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे. आता हे उपकरण काय आहे आणि भारतीय खेळाडू मनगटावर बांधून का खेळत आहेत हे जाणून घ्यायचे आहे.

काय आहे या डिव्हाईसची खासियत

टीम इंडियाच्या खेळाडूंच्या मनगटावर बांधलेले हे डिव्हाईस एक फिटनेस बँड आहे जे हूप नावाच्या कंपनीने बनवले आहे. हे उपकरण चॅट GPT ला देखील सपोर्ट करते. या उपकरणाशी काहीही संवाद साधला जाऊ शकत नाही किंवा त्याला स्क्रीनही नाही. या उपकरणातून झोपेचे चक्र, तणाव, बॉडी रिक्वहरी, हार्ट रेट यासारखी माहिती मिळते आणि ते मोबाईल अ‍ॅपद्वारे चालविले जाते.

विराट कोहलीची शतकी खेळी, ५० वं दमदार शतक ठोकलं

या डिव्हाईसचा डेटा ९९ टक्के अचूक असून तो सर्वोत्तम श्रेणीमध्ये ठेवण्यात आला आहे. या उपकरणाची विशेष गोष्ट म्हणजे ते खेळाडूंना रिकव्हरी आणि दिवसभर काम करण्याच्या अनुषंगाने अ‍ॅक्टिव्हिटी, आहार इत्यादी सुचवते आणि बहुतेक खेळाडू हे उपकरण वापरतात.

हूप हे विल अहमद यांच्या मालकीचे स्टार्टअप आहे आणि तुम्हाला हे डिव्हाईस भारतात सापडणार नाही. जर आपण या डिव्हाईसच्या किंमतीबद्दल बोललो तर त्याची किंमत २३९ डॉलर्स म्हणजेच १९,९०६ रुपये आहे. डिव्हाइस अ‍ॅपवरून ऑपरेट केले जाते आणि आपल्याला अ‍ॅपवर सर्व डेटा मिळतो.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *