ठाकरे पुन्हा भाजप सोबत?:क्लायमेट चेंजचे देशमुखांचे संकेत; तर 4 पक्ष बदलणाऱ्याने याविषयी बोलू नये म्हणत राऊतांचे प्रत्युत्तर
उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षासोबत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष देशमुख यांनी याविषयी संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे परत येत असतील तर ते त्यांच्या मूळ भूमिकेत येत आहेत. यात नवल काहीही नसल्याचे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. तर ज्यांनी स्वतः चार पक्ष बदलले त्यांनी अशा विषयावर बोलू नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी देशमुख यांना प्रत्युत्तर दिले आहे. राजकारणामध्ये काहीही शक्य आहे. उद्धव ठाकरे हे तर परत आले तर नवल नाही, असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांची परत येण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत जात होते, त्यावेळी खऱ्या अर्थाने नवल वाटत होते. मात्र आता जर ते परत येत असतील तर त्यात नवल काही नाही. ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येत असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. ते परत आल्यास स्वागत आहे का? यावर मी काहीही बोलणे योग्य नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये क्लायमेट चेंज होऊ शकतो. आता तर क्लाइमेट चेंजवर नवीन खाते देखील महाराष्ट्र मध्ये असल्याचे आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांचे प्रत्युत्तर ज्यांचे संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेले आहे. त्यांनी स्वत: चार पक्ष बदलले आहेत. त्यांनी या विषयी बोलू नये, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आशिष देशमुख यांना प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांनी स्वतःच अनेक पक्ष बदलले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा विषयात बोलले योग्य नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या माध्यमातून राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. देवेंद्र फडणवीस चुकीच्या लोकांनी वेढलेले:त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागत असल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडीच वर्षे चुकीच्या लोकांनी वेढलेले आहेत. त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, ते दैनिक सामाना वाचत आहेत, ही चांगली बाब असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी देखील शिवसेनेचे आभार मानले होते. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा….