ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलावर जीवघेणा हल्ला:सराईत गुंडांनी डोक्यात फरशी फोडत केली बेदम मारहाण

ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलावर जीवघेणा हल्ला:सराईत गुंडांनी डोक्यात फरशी फोडत केली बेदम मारहाण

शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख यांच्यावर काही सराईत गुंडांनी अकोल्यात हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील सिव्हील लाईन पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पृथ्वीराज देशमुख हे येथील एका कपड्याच्या दुकानावर उभे असताना काही गुंडांनी त्यांना अडवत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच डोक्यात फरशी फोडत बेदम मारहाण देखील करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात जमा झाले. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व गुंड कृषीनगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख पोलिस ठाण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील ठाण्यात दाखल झाले आहेत. या घटनेवर आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या मुलांवर चाकू हल्ला केल्यानंतर अर्धा तास एकही पोलिस आले नव्हते. आज माझ्या मुलाने पळ काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पुढे बोलताना नितीन देशमुख म्हणाले, मी वारंवार एसपी साहेबांना विनंती केली, शहरात गुन्हेगारी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. नितीन देशमुख म्हणाले, आज तशाच पद्धतीने माझा मुलगा दुकानाजवळ उभा होता. अचानक माझ्या मुलाच्या अंगावर प्राणघातक हल्ला केला. एकजण चाकू घेऊन आला, तर एकाने फरशी डोक्यात मारण्याचा प्रयत्न केलाय. माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघांनी पळ काढत दुकानात लपले. नाहीतर आज सुद्धा अनर्थ घडला असता, अशी भीती नितीन देशमुख यांनी व्यक्त केली. तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल
पुढे बोलताना नितीन देशमुख म्हणाले, या भागात लहान मुलांचे आणि मुलींचे फिरणे मुश्किल झाले आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एसपी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. आज पोलिस ठाण्यात आलो तर फक्त तीनच पोलिस हजर होते. एवढे मोठे पोलिस ठाणे आहे, अर्धा तास कोणीच नव्हते. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पण आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल, असा इशारा यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.

​शिवसेना ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख यांच्यावर काही सराईत गुंडांनी अकोल्यात हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील सिव्हील लाईन पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पृथ्वीराज देशमुख हे येथील एका कपड्याच्या दुकानावर उभे असताना काही गुंडांनी त्यांना अडवत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला तसेच डोक्यात फरशी फोडत बेदम मारहाण देखील करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात जमा झाले. दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व गुंड कृषीनगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख पोलिस ठाण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील ठाण्यात दाखल झाले आहेत. या घटनेवर आमदार नितीन देशमुख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या मुलांवर चाकू हल्ला केल्यानंतर अर्धा तास एकही पोलिस आले नव्हते. आज माझ्या मुलाने पळ काढल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पुढे बोलताना नितीन देशमुख म्हणाले, मी वारंवार एसपी साहेबांना विनंती केली, शहरात गुन्हेगारी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. नितीन देशमुख म्हणाले, आज तशाच पद्धतीने माझा मुलगा दुकानाजवळ उभा होता. अचानक माझ्या मुलाच्या अंगावर प्राणघातक हल्ला केला. एकजण चाकू घेऊन आला, तर एकाने फरशी डोक्यात मारण्याचा प्रयत्न केलाय. माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघांनी पळ काढत दुकानात लपले. नाहीतर आज सुद्धा अनर्थ घडला असता, अशी भीती नितीन देशमुख यांनी व्यक्त केली. तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल
पुढे बोलताना नितीन देशमुख म्हणाले, या भागात लहान मुलांचे आणि मुलींचे फिरणे मुश्किल झाले आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एसपी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. आज पोलिस ठाण्यात आलो तर फक्त तीनच पोलिस हजर होते. एवढे मोठे पोलिस ठाणे आहे, अर्धा तास कोणीच नव्हते. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पण आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल, असा इशारा यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment