ठाकरे गटाच्या उमेदवाराला हार्ट अटॅक:चोपडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना प्रचाराला निघताना आला झटका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रभाकर अप्पा सोनवणे यांना प्रचाराला निघताना हृदयविकाराचा झटका आल्याची गंभीर घटना घडली आहे. त्यांना जळगाव येथील रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…