पत्नीची हत्या केल्यानंतर राहत यांचा पती आरोपी तायमिन शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्याला लगेच अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे मृत राहत सय्यद यांचा पती तायमिन शेख याला काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधल्या रायपूर येथे हरणाची शिंगे विक्री प्रकरणात अटक झाली होती. १५ दिवसांपूर्वीच तो जामिनावर सुटून आलेला होता. लग्नाआधी तो मुंबईत फुटपाथवर साहित्य विक्रीचे काम करायचा. लग्नानंतर तायमिन आणि राहत हे दाम्पत्य राहतच्या माहेरीच राहात होते. कोणत्या कारणातून ही हत्या झाली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
राहत सय्यद यांचे वडील अज्जू सय्यद हे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. मृत राहतच्या पश्चात दोन आई, वडील आणि दोन मुलं आहेत. या घटनेने कुरखेड्यात खळबळ माजली आहे.