कोल्हापूर: अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पदावरून उचलबांगडी केलेल्या विजय देवणे यांच्या आगामी भूमिकेकडे सध्या लक्ष लागले आहे. दोन दिवस नॉट रिचेबल राहिल्याने संशयाचे वातावरण तयार झाले होते. पण ‘माझ्यावर अन्याय झाला असे सांगतानाच मरेपर्यंत ठाकरे गटाशी निष्ठावान राहणार’ अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट झाली आहे.
ओबीसी नेत्यांनी राजकारण करू नये, भुजबळ-मुंडे-बावनकुळेंनी आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी : पाटीलदेवणे हे गेली बारा वर्षे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. पण त्यांच्याबाबत काही तक्रारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याने दोन दिवसापूर्वी त्यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्या जागी प्रा. सुनील शिंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले देवणे नॉट रिचेबल झाले. त्यातून ते भाजप अथवा शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. नुतन जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे यांच्या पत्नी काँग्रेसच्या कोट्यातून बाजार समितीमध्ये निवडून आल्याने देवणे आणि शिंत्रे यांच्यात वाद सुरू झाला होता.

हा वाद नंतर टोकाला गेला. देवणे यांना पदावरून हटवा अशी मागणी पुढे आली. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी कारवाई होऊ नये अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली. कारण यापूर्वी देवणे यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांना चांगली मते मिळाली. शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने देवणे यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली असतानाच त्यांना पदावरून हटविण्यात आले. त्यांना सहसंपर्क पद देत पर्याय दिला असला तरी हे पद मुळ राजकीय प्रक्रियेतून बाहेर काढणार असल्याची चर्चा आहे.

शेखर बंगाळेला लाथा बुक्क्यांनी मारलं हे निंदनीय, गुरुनं केली चेल्याची पाठराखण

या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी पक्षाच्या निर्णयावर निश्चितपणे नाराज आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे. गेली बारा वर्षे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना पक्षाची ताकद वाढविली. पण काहीजण पक्षाचा वापर करत इतर पक्षाच्या कोट्यातून पदे मिळवत आहेत. याला विरोध केल्यानेच आपल्याविरोधात मोहीम राबविण्यात आली. पक्षावर नाराज असलो तरी आपण मरेपर्यंत ठाकरे यांच्यासोबतच राहणार, त्यांच्याशीच निष्ठा ठेवणार असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील दुसरे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव हे देखील नाराज झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीतून नुकतेच शिवसेनेत आलेल्या हाजी अस्लम सय्यद यांना शिवसेना सहसंपर्कपद दिल्याने जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *