मुंबई : शिवसेनेच्या गोरेगावच्या मेळाव्याला द्विधा मनस्थितीत अससेले खासदार गजानन कीर्तिकर येणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. पण उद्धव ठाकरे येण्याआधी अर्धा तास अगोदर कीर्तिकरांनी सभास्थळी हजेरी लावली. पण तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना सुनावत घरचा आहेरही दिला. “आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा नको, झालं एवढं बस्स झालं… सेना आणि भाजपची नैसर्गिक युती आहे, असं सांगत आता एकनाथ शिंदे आणि आपण समेट घडवायला हवा”, असं मोठं वक्तव्य खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलं.

दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेला दसरा मेळावा, त्यावरुन सुरु असलेली ‘लढाई’, शिंदे गटाशी घेतलेला पंगा, आगामी मुंबई महापालिका निवडणुका अशा सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज गोरेगावच्या नेस्को मैदानावर सभा होत आहे. थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी मनोहर जोशी, लिलाधर डाके, गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीची सगळ्यांनाच उत्सुकता होती. पण काही कारणांमुळे मनोहर जोशी सभेला येऊ शकणार नाहीत, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली. तर डाके आणि कीर्तिकर यांचं सभास्थळी आगमन झालं.

मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, संजय राऊत तुरुंगात, पण उद्धव ठाकरेंच्या सभेत खुर्ची मात्र राखीव!
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी कीर्तिकर इच्छुक असल्याच्या चर्चा होत होत्या. कीर्तिकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्याचंही वृत्त आलं होतं. त्यामुळे आजच्या सभेला येऊन कीर्तिकर काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलेलं होतं. तशीच खळबळजनक भूमिका कीर्तिकरांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचं प्लॅनिंग करत असताना आणि मविआ नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहत असताना काँग्रेस राष्ट्रवादीसोबकचा प्रयोग बस्स झाला, आपली आणि भाजपची नैसर्गिक युती आहे, असं सांगत कीर्तिकरांनी उद्धव ठाकरेंना घरचा आहेर दिला.

गजानन कीर्तिकर काय म्हणाले?

आता आपली पुढील वाटचाल राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नको. महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९ साली झाला आणि तो संपलाही. आपला नैसर्गिक मित्र भाजप आहे. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबतही समेट घडवायला हवा. आता आणखी किती वर्षे एकमेकांशी भांडत राहणार? त्या वादात एकमेकांची डोकी फुटणार, त्यापेक्षा समेट घडवायला हवा, असं कीर्तिकर म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.