ठाकरेंनी दट्टू देताच अंबादास दानवे-चंद्रकांत खैरेंची दिलजमाई?:संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर भगवा फडकविण्याचा निर्धार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी आधीच सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. यातच संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांना चांगलाच दट्टू दिला असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता या दोन्ही नेत्यांमध्ये दिलजमाई झाल्याचे संकेत मिळत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात या दोघांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र काम करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच संभाजीनगर महानगर पालिकेवर स्वबळावर भगवा फडकवण्याचा निर्धार देखील व्यक्त केला. याविषयी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मी माझे काम करत आहेत तर चंद्रकांत खैरे त्यांचे काम करत आहेत. आम्ही कधीही एकमेकांना त्यांच्या कामापासून थांबवले नाही. मात्र, शिवसैनिक फार कलाकार आहेत. तेच आमचे दोघांचेही कान भरण्याचा प्रयत्न करतात. मात्र मी एका कानाने ऐकून एका कानाने सोडून देतो. चंद्रकांत खैरे यांचे आता वय झाले आहे. त्यामुळे ते पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतात, अशा शब्दात दानवे यांनी दोघांमधील मतभेदाचे खापर शिवसेना पदाधिकाऱ्यांवर फोडले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा संभाजीनगर जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा मेळावा संपन्न झाला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकविण्याचा निर्धार एकमुखाने करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीत वाटलेला आम्हा पैसा कुठून आणला? – खैरे तुटकळ पैशांच्या अमिषापोटी काही पदाधिकाऱ्यांनी आपले इमान गद्दार गटाच्या हाती विकले आहे. दोन वेळेस एकाच घरात संभाजीनगर महानगरपालिकेसारख्या महत्त्वपूर्ण महानगरपालिकेचे महापौर पद दिलेल्या माजी महापौराने शिवसेनेशी गद्दारी केली. मंत्री संजय शिरसाट यांची गुलामी करण्यासाठी या महापौराने शिवसेना सोडली असल्याची टिका करत शिवसेना सोडणाऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचे सांगत पक्षांतर करणाऱ्याचा चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत वाटलेला आम्हा पैसा कुठून आणला ? असा प्रश्न देखील खैरे यांनी यावेळी उपस्थित केला. संघाचे लोक आता थेट पुढच्या विधानसभेलाच बाहेर येतील – दानवे शिवसैनिकांनी परिपक्वतेने खोट्या पक्षांतराच्या बातम्या समजून घेतल्या पाहिजे, माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. सर्वसामान्य शिवसैनिकांपासून ते मोठमोठ्याल्या पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या शिवसेनेशी गद्दारी करण्याची हिंमत कोणीच करु शकत नाही, असे स्पष्ट मत व्यक्त करत शिवसेनेशी गद्दारी केलेले लोकं मुख्यमंत्री झाले. परंतू जनमानसात त्यांना कधीच सन्मान मिळू शकणार नसल्याचे, वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देशातील प्रथम असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी राज्याच्या विधान भवनात हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या प्रचारासाठी घरोघरी गेले. विधानसभा निवडणुक झाल्यानंतर आता ते जातील का ? हे बघावे. संघाचे लोक आता थेट पुढच्या विधानसभा निवडणुकीला बाहेर येतील, अशी भूमिका दानवे यांनी यावेळी मांडली. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… दानवेंची तक्रार त्यांच्या ‘आईं’कडे, तर चंद्रकांत खैरे यांची करा “मातोश्री”वर:‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा सल्ला पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादासदानवे हे वेगवेगळ्या बैठका घेतात,अशी तक्रार उद्धवसेनेच्यापदाधिकाऱ्यांनी ‘मातोश्री’वरआयोजित बैठकीत केली. त्यावरदोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन पक्षासाठीकाम करावे, अशा सूचना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांनी केल्या.त्याचबरोबर, ‘अंबादास दानवे यांची तक्रार त्यांच्या आईंकडे करा आणिखैरे ऐकत नसतील तर मला कळवा,’ असा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांनादिला. ‘पक्षाचा संघर्षाचा काळ आहे. आम्ही तयार आहोत. मात्र, पक्षाला ब्लॅकमेल करू नका. ज्यांना जायचेआहे त्यांनी जावे,’ असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. छत्रपतीसंभाजीनगरमधील पदाधिकारी, माजी नगरसेवकांची गुरुवारी संध्याकाळी मातोश्रीवर बैठक पार पडली. त्यानंतर शुक्रवारी ते संभाजीनगरात आले. पूर्ण बातमी वाचा…