शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हापासून काही अपवाद वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा हा कधीच चुकलेला नाही. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेनेच्या परंपरेचा भाग झाला होता. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करुन लक्षवेधी प्रतिक्रिया दिलीये.

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरेंनी मैदान मारलं, सरशी झाली!
  • कोर्टाचा ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हिरवा कंदील
  • बाळासाहेबांचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले…
मुंबई : साडे चार तासांच्या सुनावणीनंतर बॉम्बे हायकोर्टाने अखेर उद्धव ठाकरे यांना शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. शिवसेना, मुंबई पालिका आणि शिंदे गटाच्या वकिलांनी आपापली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने आपली निरीक्षणे नोंदवत मुंबई महापालिकेने आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचं म्हणत पालिका शिंदे गट गटाला दणका देताना ठाकरेंना मेळाव्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र लक्ष वेधून घेणारी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्यसाधारण असे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली होती. तेव्हापासून काही अपवाद वगळता शिवसेनेचा दसरा मेळावा हा कधीच चुकलेला नाही. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवसेनेच्या परंपरेचा भाग झाला होता. हाच धागा पकडून रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो पोस्ट करुन लक्षवेधी प्रतिक्रिया दिलीये.

रोहित पवार काय म्हणाले??

कोर्टाने ठाकरेंना दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली. परंपरा अबाधित राहिली! सर्व निष्ठावान शिवसैनिकांचे अभिनंदन!, अशा भावना व्यक्त करत रोहित पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा सभा घेत असतानाचा फोटो शेअर करुन दसरा मेळाव्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आजपर्यंत शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला मुंबई महानगरपालिकेची परवानगी मिळणे, हा केवळ औपचारिकतेचा भाग होता. परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील एक मोठा गट फोडल्याने पहिल्यांदाच शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच उद्धव ठाकरे गटाच्या पाठोपाठ शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्याने पेच निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून शिवसेनेने हरप्रकारे प्रयत्न केले होते. मुंबई महानगरपालिका दसरा मेळाव्याला परवानगी देणार नाही, हे दिसताच शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज अखेर साडे चार तासांच्या युक्तिवादानंतर शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.