[ad_1]

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची आज मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी ठाण्याच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात जाहीर सभा होत असून या सभेआधी कल्याणहून ठाणे शहरात दाखल होणाऱ्या पाटील यांचा भव्यदिव्य रोड शो होणार आहे. या अनुषंगाने शहरात वाहतूककोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने वाहतूक बदल केले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील चौकाचौकांत, मुख्य नाक्यांवर, रस्त्यांच्या दुतर्फा आणि गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या परिसरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे.

मनोज जरांगे-पाटील मंगळवारी ठाण्यात सभेसाठी येणार आहेत. या सभेआधी त्यांचे ठाण्यात विविध ठिकाणी स्वागत केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे शहरात होणारी संभाव्य कोंडी टाळण्यासाठी सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. सभास्थळी दाखल होण्याआधी पाटील यांचे खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी, ठाणे महापालिका मुख्यालय येथे स्वागत होणार आहे. तसेच, अल्मेडा चौक, वंदना सिनेमा मार्ग, गजानन महाराज चौक, पु. ना. गाडगीळ चौक, मुस चौक येथून मार्गस्थ होणारे पाटील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे सभेसाठी येणार आहेत. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी वाहतूक बदल जाहीर केले आहेत.

* असे आहेत बदल

– डॉ. मुस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉ. मुस चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टॉवरनाका, टेंभीनाकामार्गे पुढे जातील.

– गडकरी चौक येथून डॉ. मुस चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने अल्मेडा चौक, वंदना सिनेमा चौक, गजानन चौक, तीन पेट्रोल पंप, हरिनिवासमार्गे पुढे जातील.

– न्यू इंग्लिश शाळा येथून राम मारूती रोडच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना न्यू इंग्लिश शाळेपासून काही अंतरावर प्रवेशबंदी असेल. येथील वाहने बेडेकर रुग्णालय, राजमाता वडापावमार्गे पुढे जातील.

– पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स चौक येथून तलावपाळीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना पु. ना. गाडगीळ चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने श्रद्धा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापावमार्गे पुढे मार्गस्थ होतील.
बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर भारताचे दोन तुकडे झाले असते: विजय वडेट्टीवार
नोकरदारांना फटका बसण्याची शक्यता

सकाळी कामानिमित्ताने ठाणे रेल्वे स्थानाकाकडे येणाऱ्या रिक्षा, खासगी वाहने व दुचाकीस्वारांना या वाहतूक बदलांचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता आहे. सकाळी दहा वाजता जरांगे-पाटील यांची सभा असल्याने पहाटेपासूनच ठिकठिकाणांहून मराठा समाजातील कार्यकर्ते ठाण्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त

जरांगे-पाटील यांचा रोड शो पोलिस परिमंडळ एकमधील कळवा, राबोडी, ठाणेनगर, नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणार असल्याने या पोलिस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. यासोबतच एसआरपीएफच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *