‘एक हैं तो सेफ हैं’च्या घोषणेमुळे उत्तर महाराष्ट्रातून उबाठा हद्दपार:आघाडीतील मतभेदांचा मोठा फटका बसला

‘एक हैं तो सेफ हैं’च्या घोषणेमुळे उत्तर महाराष्ट्रातून उबाठा हद्दपार:आघाडीतील मतभेदांचा मोठा फटका बसला

या भागात महाविकास आघाडीने नऊ जागा गमावून सर्वाधिक नुकसान करून घेतले आहे. मंत्री महाजन आणि भुजबळ यांना पराभूत करता आले नसले तरी त्यांचे मताधिक्य घटले. जागावाटपात चाललेला घोळ आणि शरद पवार यांच्याशी बार्गेनिंग करण्यात आलेले अपयश यामुळे पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंची शिवसेना हद्दपार झाली आहे. विशेष म्हणजे या प्रांतात अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनली असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही दाेन आकडी आमदार मिळवण्यात यश आले आहे. ‘एक हैं तो सेफ हैं’ ही सर्वाधिक चर्चेत आलेली भाजपची घोषणा नरेंद्र मोदी यांनी याच प्रांतात दिली होती. त्यामुळे धुळे विधानसभा आणि ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसकडून यश खेचून घेण्यात भाजपला यश आले आहे. अजित पवारांनी फारसे लक्ष दिले नाही तरी त्यांना यश आणि शरद पवारांनी दौरे करूनही त्यांना अपयश आलेे आहे. मालेगाव मध्य आणि जामखेडची अटीतटीची लढत चर्चेत आली आहे. गावित कुटुंबीयांनी प्रभाव दाखवलाच नंदुरबारला विजयकुमार गावित विजयी झाले. त्यांचे भाऊ शरद गावित आणि मुलगी डाॅ. हिना यांनी अपक्ष असून काँग्रेस पक्षाला नाकीदम आणला. मराठा फॅक्टर फारसा प्रभावी ठरलाच नाही मनोज जरांगेंचा आरक्षण मुद्दा इकडे चालला नाही. कारण बहुतांश मराठा हे कुणबी प्रमाणपत्र धारण करणारेच आहेत. त्यामुळे आघाडीला अपयश आले.
लाडकी बहीण योजना ठरली मोठी लाभदायी महिलांनी केलेल्या भरघोस मतदानामुळेच या भागात महायुतीला इतकी मते मिळू शकली. त्यात काँग्रेसलाही मोठा फटका बसला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment