[ad_1]

नवी दिल्ली : वर्ल्ड कपचे रणशिंग आता फुंकले गेले आहे. पण त्याचबरोबर सामान्य चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना आता वर्ल्ड कपमध्ये सहभागी होता येणरा आहे. पण त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल आणि त्याचबरोबर एक व्हिडिओ पाठवावा लागणार आहे.
वर्ल्ड कपच्या संघात सहभागी होण्यासाठी काय आहेत नियम, जाणून घ्या…
१. तुमची १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे आणि तुमच्याकडे भारताचे नागरिकत्व असायला हवे.
२. संघात सहभागी होण्यासाठी तुम्ही एक सहा चेंडूंच्या षटकाचा व्हिडिओ अपलोड करणे अनिवार्य आहे.
३. हे व्हिडिओ तुम्ही १७ सप्टेंबरपूर्वी अपलोड करणे गरजेचे आहे.
४. जर तुम्ही वेगवान गोलंदाज असाल तर तुम्हाला किमान ताशी १२० कि.मी.च्या वेगाने गोलंदाजी करायला यायला हवी.
५. जर तुम्ही फिरकी गोलंदाज असाल तर तुम्हाला किमान ताशी ८० कि.मी.च्या वेगाने गोलंदाजी करायला यायला हवी.

वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्सचा संघ पात्र ठरला आहे. नेदरलँड्सच्या संघाने सोशल मीडियावर एक जाहीरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “जर तुम्ही गोलंदाजी करू शकत असाल आणि संघाच्या ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या तयारीचा भाग बनू इच्छित असाल, तर खालील लिंकवर जा आणि तुमचा व्हिडिओ अपलोड करा.” यावेळी app.ludimos.com/partners/kncb?promotionId=wc23-net-bowler-trial ही लिंक नेदरलँड्सच्या संघाने ट्विटरवर पोस्ट केली आहे. पण त्याचवेळी त्यांनी काही नियमही ठेवले आहेत.

वनडे वर्ल्ड कप भारतामध्ये ५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या वर्ल्ड कपचे सामने पाहणे सोडा तर सामान्य चाहत्यांना आता विश्वचषकातील संघाचा एक भाग होता येणार आहे. कारण जर तुमच्यामध्ये गुणवत्ता असेल तर तुम्हाला वर्ल्ड कपच्या संघात राहून खेळता येणार आहे. यावेळी ज्या खेळाडूंच्या निवड होईल, ते नेदरलँड्च्या संघाबरोबर राहतील आणि त्यांची नेट्स गोलंदाज म्हणून मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्यांची निवड होईल, त्यांना वर्ल्ड कपच्या संघाबरोबर फिरण्याची मुभा असेल.

सूर्यकुमार यादव आशिया कपसाठी रवाना

नेदरलँड्सच्या क्रिकेट मंडळाने आता एक जाहीरात दिली आहे आणि त्यांना काही खेळाडूंची भारतामध्ये गरज आहे. त्यांनी अर्ज करण्यासाठी एक लिंक दिली आहे आणि अर्ज करताना आपला एक व्हिडिओ पाठवणे गरजेचे आहे. त्यामुळे आता या जाहिरातीला किती चांगला प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *