पुण्यात महंमद पैगंबर यांची जयंती डीजेमुक्त साजरी होणार:निर्णयाचे पुणे पोलिसांकडून कौतुक

पुण्यात महंमद पैगंबर यांची जयंती डीजेमुक्त साजरी होणार:निर्णयाचे पुणे पोलिसांकडून कौतुक

प्रेषित महंमद पैगंबर जयंती दिनांक १६ सप्टेंबर रोजी आणि 17 तारखेला गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने प्रेषित महंमद पैगंबर जयंती निमित्त काढली जाणारी मिरवणूक 21 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय सिरत कमिटी ने घेतला आहे. यंदाची प्रेषित महंमद पैगंबर जयंतीची मिरवणूक ही डीजे मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पुणे पोलीस आयुक्त, सहआयुक्त व पोलीस प्रशासन सीरत कमिटी व सामाजिक संघटनांची संयुक्त बैठकीत घेण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डीजे मुक्त पैगंबर जयंती साजरी करण्याच्या निर्णयाचा पुणे पोलिसांनी कौतुक केले आहे. सिरत कमिटीने घेतलेला डीजे मुक्त पैगंबर जयंती हा निर्णय अत्यंत सामाजिक सौहार्द, जातीय सलोखा निर्माण करणारा व दोन समाजामध्ये बंधू भाईचारा वाढविणारा असून पुणे पोलीस तुमच्या या कार्याचा स्वागत व गौरव करीत आहे. पुणे पोलीस सहआयुक्त माननीय रंजन कुमार शर्मा यांना सिरत कमिटीच्या वतीने विनंती करण्यात आली होती ती डीजे वाजविणे, ढोल ताशे, गाणे व लेझर लाइटिंग असा सर्व चुकीचा प्रथेला इस्लाम धर्माने स्पष्टपणे नाकार दिलेला आहे. त्याबाबत इस्लाम धर्माचा कोणताही पंत असो त्या पंथा नुसार अशा पद्धतीचा गैर कृत्य करणे किंवा डीजे लावून पैगंबर जयंती साजरी करणे इस्लामला मान्य नाही, त्याबाबत सिरत कमिटीच्या सर्व वरिष्ठांनी इस्लाम धर्माच्या अभ्यासक,सखोल माहिती असणाऱ्या धर्मगुरू यांनी एक मुखांनी निर्णय घेतला आहे. 200 पेक्षा जास्त मशिदीतील धर्मगुरूंनी य सीरत कमिटीच्या निर्णयाला पाठिंबा दिला व त्यांनी अहवान केले की आमच्या भागात असलेल्या स्थानिक मंडळांनाही आम्ही आवाहन केले आहे, यावर्षी डीजे न वाजवता पारंपारिक पद्धतीने व शांती पूर्वक मुस्लिमांनी प्रेषित महंमद पैगंबर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन केले आहे. पुणे शहरातील सिरत कमिटीच्या डीजे मुक्त प्रेषित पैगंबर जयंतीची मिरवणुकीचा पुणे शहरातील 200 मुस्लिम धर्मगुरूंनी पाठिंबा दिला व तसेच पैगंबर यांच्या जयंतीत सामील होणाऱ्या जवळपास 137 संघटनांना आवाहन केले आहे.

​प्रेषित महंमद पैगंबर जयंती दिनांक १६ सप्टेंबर रोजी आणि 17 तारखेला गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने प्रेषित महंमद पैगंबर जयंती निमित्त काढली जाणारी मिरवणूक 21 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय सिरत कमिटी ने घेतला आहे. यंदाची प्रेषित महंमद पैगंबर जयंतीची मिरवणूक ही डीजे मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान पुणे पोलीस आयुक्त, सहआयुक्त व पोलीस प्रशासन सीरत कमिटी व सामाजिक संघटनांची संयुक्त बैठकीत घेण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डीजे मुक्त पैगंबर जयंती साजरी करण्याच्या निर्णयाचा पुणे पोलिसांनी कौतुक केले आहे. सिरत कमिटीने घेतलेला डीजे मुक्त पैगंबर जयंती हा निर्णय अत्यंत सामाजिक सौहार्द, जातीय सलोखा निर्माण करणारा व दोन समाजामध्ये बंधू भाईचारा वाढविणारा असून पुणे पोलीस तुमच्या या कार्याचा स्वागत व गौरव करीत आहे. पुणे पोलीस सहआयुक्त माननीय रंजन कुमार शर्मा यांना सिरत कमिटीच्या वतीने विनंती करण्यात आली होती ती डीजे वाजविणे, ढोल ताशे, गाणे व लेझर लाइटिंग असा सर्व चुकीचा प्रथेला इस्लाम धर्माने स्पष्टपणे नाकार दिलेला आहे. त्याबाबत इस्लाम धर्माचा कोणताही पंत असो त्या पंथा नुसार अशा पद्धतीचा गैर कृत्य करणे किंवा डीजे लावून पैगंबर जयंती साजरी करणे इस्लामला मान्य नाही, त्याबाबत सिरत कमिटीच्या सर्व वरिष्ठांनी इस्लाम धर्माच्या अभ्यासक,सखोल माहिती असणाऱ्या धर्मगुरू यांनी एक मुखांनी निर्णय घेतला आहे. 200 पेक्षा जास्त मशिदीतील धर्मगुरूंनी य सीरत कमिटीच्या निर्णयाला पाठिंबा दिला व त्यांनी अहवान केले की आमच्या भागात असलेल्या स्थानिक मंडळांनाही आम्ही आवाहन केले आहे, यावर्षी डीजे न वाजवता पारंपारिक पद्धतीने व शांती पूर्वक मुस्लिमांनी प्रेषित महंमद पैगंबर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन केले आहे. पुणे शहरातील सिरत कमिटीच्या डीजे मुक्त प्रेषित पैगंबर जयंतीची मिरवणुकीचा पुणे शहरातील 200 मुस्लिम धर्मगुरूंनी पाठिंबा दिला व तसेच पैगंबर यांच्या जयंतीत सामील होणाऱ्या जवळपास 137 संघटनांना आवाहन केले आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment