ठाणे : खोकल्याच्या औषधांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झालेल्या बाळाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन नको, म्हणून आपल्या आठ महिन्याच्या मुलाचा मृतदेह घेऊन पिता पसार झाल्याची घटना ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली. या घटनेमुळे कळवा रुग्णालयातील गलथान कारभाराचा प्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ठाणे पालिकेच्या कळवा रुग्णालयात गुरुवारी रात्री आठ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते. त्यावेळी निमोनियाचे देखील लक्षण होती.
तीन लाखांची लाच, वरिष्ठ रेल्वे अधिकारी केसी जोशींना रंगेहाथ अटक, घरात अडीच कोटींचं घबाड याची माहिती रुग्णालयाकडून तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ – डायघर येथून या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. एका आठ महिन्याच्या बाळाला भर रुग्णालयातून घेऊन जात असताना रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था काय करत होती? असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.