मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव शहरातील अनिकेट भागातील आकाश प्रमोद खाकरे हा युवक मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. दरम्यान काल रात्री त्याने स्वःच्या रूममध्ये जाऊन धारदार चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. यानंतर रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी मृतकचे काका अजय खाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
खाकरे कुटुंबीय अनिकट रोड भागात रविंद सरोदे यांच्या घरात भाड्याने राहतात. आकाशने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. आज तान-तणाच्या आणि धावपळीच्या युगामध्ये सतत तुम्हाला मुख्यतः युवकांना सिद्ध करावे लागतात. शिक्षण किंवा रोजगाराच्या चांगल्या संधीकरिता सतत धावपळ करावी लागते. त्यामध्ये कुठे टोकाचे पाऊल ही युवा पिढी उचलते आहे. कोणत्या दिशेने जात आहे, हे निश्चित चिंतन करण्यासारखी बाब म्हणावी लागेल.अनेक वेळा नैराश्यातून आणि मेडिटेशन सारखे प्रबोधन वेळोवेळी केल्या जाते. त्यानंतर देखील युवा पिढी या टोकाच्या पावलाच्या दिशेने आपला प्रवास करतात. संपूर्ण परिवार अंधकारमय होऊन जातो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.