देशात एकेकाळी समाजवादी आणि साम्यवादी यांचा बोलबाला होता:पण औद्योगिक प्रगती नंतर ते बाजूला पडले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
देशाचा विकास कऱ्याचा असेल तर त्याला चार मापदंड आहे ते म्हणजे पाणी, ऊर्जा, दळणवळण, कम्युनिकेशन. या गोष्टी जिथे असेल त्याठिकाणी उद्योग येऊन रोजगार निर्माण होऊन विकास अल्पावधीत साधला जातो. स्वातंत्र्यानंतर लोक ग्रामीण भागातून शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले.देशात समाजवादी आणि साम्यवादी यांचा एकेकाळी बोलबाला होता पण औद्योगिक प्रगती नंतर ते काळाच्या ओघात बाजूला पडले असे मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, देशात लोकशाही चार स्तंभावर उभी आहे. संविधान मध्ये त्यांचे कर्तव्य स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. परिस्थिती सातत्याने बदलत आहे. त्याकाळात मतभिन्नता होती पण आता केवळ मतभिन्नता नाही तर मत शून्यता देखील आहे. कोण कुठे कधी जाईल सध्या सांगता येत नाही अशी परिस्थिती सर्वत्र होऊ लागली आहे. मात्र, काही जण आपली विचार तत्वे धरून आहे. मला,अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेण्यासाठी आवश्यक गुण मिळाले नाही, पण आता मला नऊ डिलीट पदवी मिळाल्या आहे. पण अजून मी कधी डॉक्टर शब्द मागे लावत नाही कारण, माझे मत मी त्या लायकीचा अजून झालो नाही. ज्ञान मिळवणे आवश्यक आहे पण काही जण शाळेत न जाता देखील त्यांनी समाजाला ज्ञान देऊन विकासाचे दिशेने नेले. दुरून ज्यांना आपण मोठे समजत होतो ते लहान असून ज्यांना लहान दुर्लक्षित समजत होतो ते मोठे असल्याचे अनुभवातून जाणवले. अंधारात माणसाचे जे वर्तन असते ते त्याचे चारित्र्य असते.