स्वतःमधील गुण ओळखून योग्यता वाढवा:शिवमहापुराण कथेत पंडित प्रदीप मिश्रा यांचा भाविकांना उपदेश
परमेश्वराने मानवाची निर्मिती करताना कोणताही भेदभाव केला नाही. पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाला परमेश्वराने सर्वकाही सारखे दिले आहे. त्यामुळे परिस्थितीचा त्रागा न करता आपल्या स्वतः मध्ये असलेल्या गुणांचा योग्य वापर करून आपली योग्यता वाढवावी, असा उपदेश पं. प्रदीप मिश्रा यांनी रविवारी (दि. २९) केला. पंडितजींनी आपल्या निरूपणात पुढे सांगितले की, रावणाने भगवान महादेवांना प्रश्न विचारला की सृष्टीत स्वर्गलोक, पितृलोक आदी समृद्ध लोक असताना तुम्ही मृत्युलोकात का निवास करतात. त्यावर उत्तर देताना महादेव म्हणाले की, परमेश्वराचे भजन केवळ मृत्युलोकात केले जाते आणि भक्तांच्या मदतीला जाणे मला आवडते. यास्तव मी मृत्युलोकात निवास करतो. भगवान महादेवांना स्वतःला मृत्युलोक प्रिय असल्याने प्रत्येक मनुष्याने प्रामाणिकपणे आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाला प्राथमिकता देऊन फावल्या वेळेत नामस्मरण करावे. परमेश्वर तुमची वाट नक्कीच सुकर करेल असे पंडितजींनी सांगितले. कथेला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवार असल्याने गर्दी रविवार सुटीचा दिवस असल्याने नोकरदार वर्गाने हजेरी लावल्याने कथास्थळ गर्दीने फुलून गेले होते येथील गर्दीचे व्यवस्थापन, रहदारीचे नियंत्रण, भाविकांच्या भोजनापासून निवासाची व्यवस्था सर्वकाही सुरळीत असल्याने पंडितजींनी आयोजकांच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत कथेच्या पुढील यजमानांनी इथल्याप्रमाणे आयोजन करावे , असे सांगितले.