आजच्या लेखात आपण पारंपरिक कपड्यांचा ब्रँड मन्यावरचे संस्थापक आणि एमडी रवी मोदी यांच्या संदर्भात बोल्ट आहेत. गेल्या वर्षी IIFL हुरून इंडिया रिच लिस्ट २०२२ मध्ये मोदी सर्वात जलद कमाई करणारे उद्योगपती म्हणून मोदींनी श्रीमंतांच्या यादीत प्रवेश मिळवला होता. फोर्ब्सनुसार ४६ वर्षीय रवी मोदी यांची संपत्ती ३.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच २८,३१९ कोटी रुपये असून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ६४ व्या क्रमांकावर आहेत. मात्र त्यांनी रातोरात यश संपादन केले नाही, तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनीही खूप मेहनत घेतली.
कोण आहेत रवी मोदी?
रवी मोदींच्या वडिलांचे कोलकात्यात कपड्यांचे छोटेसे दुकान होते जिथे ते लहानपणापासून वडिलांना मदत करायचे. वयाच्या १३व्या वर्षापासून रवी नियमितपणे दुकानात काम करू लागले आणि नऊ वर्षे दुकानात काम करत असताना त्यांना विक्रीतील गुंतागुंत जाणून घेतली. यादरम्यान त्यांनी कोलकाता येथील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बी.कॉम केल्यानंतर एमबीए करण्याचा विचार केला पण वडिलांनी सांगितले की, तुम्ही गेल्या नऊ वर्षांत खरे एमबीए केले आहे. अशाप्रकारे रवी मोदी यांनी वडिलांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम सुरू केले यादरम्यान वडिलांशी मतभेद झाल्यावर आईकडून मिळालेल्या दहा हजार रुपयांतून त्यांनी वेदांत फॅशन कंपनीचा पाया घातला.
आईकडून घेतेले १० हजार रुपये
त्यांनी भारतीय वांशिक पोशाख बनवण्यास सुरुवात केली आणि कोलकाता ते पश्चिम बंगालच्या इतर शहरांमध्ये तसेच उत्तर प्रदेश, ओडिशा, बिहार आणि मध्य प्रदेशात विक्री सुरू केली. त्यांनी बनवलेले कपडे चांगल्या दर्जाच्या आणि डिझाइनमुळे लोकांना पसंत पडू लागले. यानंतर मोदींनी आपल्या कपड्यांना ‘मान्यावर’ ब्रँड असे नाव दिले. बाजार पेठेसोबतच त्यांनी विशाल मेगा मार्ट आणि पँटालूनसारख्या मोठ्या दुकानांनाही टक्कर दिली. रवी मोदी यांनी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये वेदांत फॅशनचे पहिले स्टोअर उघडले तर आज त्यांची देशभरात ६०० हून अधिक स्टोअर्स आहेत.
साधेपणाला प्राधान्य
२०१६ मध्ये टीम इंडियाचा (माजी) कर्णधार विराट कोहली कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवला ज्यांनंतर ब्रँडला पंख फुटले. त्यानंतर कंपनीने अभिनेत्री अनुष्का शर्माला आपल्या सोबत जोडले आणि महिला ब्रँड ‘मोहे’ बाजारात लॉन्च केला. त्यानंतर उच्च मध्यमवर्गासाठी Tvamev ब्रँड आणि खालच्या वर्गासाठी ‘मंथन’ ब्रँड लॉन्च केला. गेल्या काही वर्षात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनाही ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जोडले गेले.
गेल्या वर्षी २०२२ मध्ये शेअर बाजारात कंपनी सूचिबद्ध झाली असून कंपनीचे मार्केट कॅप (बाजार भांडवल) आज ३२,३५४.४० कोटी रुपये आहे. साधेपणा पसंत करणारे रवी मोदी एक उद्योगपती असले तरी मेट्रो शहराच्या गजबजाटापासून दूर कोलकात्याच्या बाहेरील एका सोसायटीत राहतात.