मराठी भाषेतील गीतरामायणाचे वैभव आता हिंदीत:गदिमांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये पहिल्या प्रयोगाचे आयोजन

मराठी भाषेतील गीतरामायणाचे वैभव आता हिंदीत:गदिमांच्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये पहिल्या प्रयोगाचे आयोजन

अधुनिक वाल्मिकी गदिमा आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके या दोन कलाकारांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली ‘गीतरामायण’ ही कलाकृती म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अमोल असे वैभव आहे. या वैभवाचा लाभ संपूर्ण भारत वर्षाला मिळावा यासाठी त्याचा भावानुवाद हिंदी भाषेत करण्यात आले असून, त्याचा देशातील पहिला प्रयोग १ ऑक्टोबर रोजी कोथरूड मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभू रामचंद्राची कथा अजरामर आहे. अनेक ‌कवींनी, साहित्यिकांनी साहित्याच्या विविध प्रकारातून ती गुंफली आहे. परंतु, गजानन दिगंबर माडगूळकर यांनी हे काव्यबद्ध करत त्यातील भावसौंदर्य वाढवले आहे.कारण, मानवी ‌जीवनविषयक तात्विक मौलिक विचार सहजसुलभ भाषेत गीतरामायणातून व्यक्त झालेले आहेत. गीतरामायणात सुबोध भाषेत बोध आहे. विविध व्यक्तीमत्वाचे प्रभावी स्वरुपाचे चित्रण यामधून गदिमांनी केले आहे. संभ्रमित मनाला जीवनमूल्यांची ओळख गीतरामायणाने करून दिली आहे. त्यामुळे हे वैभव संपूर्ण देशाला लाभावे यासाठी प्रसिद्ध गझलकार देवदत्त जोग यांनी हिंदी भाषेत भावानुवादित केले आहे. याला भारत सरकारने ही प्रायोजकत्व दिले आहे. गदिमांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये याचे आयोजन करण्यात आले असून; १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वा. ते १२.३० वा. या वेळेत कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा सर्व गदिमा प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

​अधुनिक वाल्मिकी गदिमा आणि श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके या दोन कलाकारांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेली ‘गीतरामायण’ ही कलाकृती म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे अमोल असे वैभव आहे. या वैभवाचा लाभ संपूर्ण भारत वर्षाला मिळावा यासाठी त्याचा भावानुवाद हिंदी भाषेत करण्यात आले असून, त्याचा देशातील पहिला प्रयोग १ ऑक्टोबर रोजी कोथरूड मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यासाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभू रामचंद्राची कथा अजरामर आहे. अनेक ‌कवींनी, साहित्यिकांनी साहित्याच्या विविध प्रकारातून ती गुंफली आहे. परंतु, गजानन दिगंबर माडगूळकर यांनी हे काव्यबद्ध करत त्यातील भावसौंदर्य वाढवले आहे.कारण, मानवी ‌जीवनविषयक तात्विक मौलिक विचार सहजसुलभ भाषेत गीतरामायणातून व्यक्त झालेले आहेत. गीतरामायणात सुबोध भाषेत बोध आहे. विविध व्यक्तीमत्वाचे प्रभावी स्वरुपाचे चित्रण यामधून गदिमांनी केले आहे. संभ्रमित मनाला जीवनमूल्यांची ओळख गीतरामायणाने करून दिली आहे. त्यामुळे हे वैभव संपूर्ण देशाला लाभावे यासाठी प्रसिद्ध गझलकार देवदत्त जोग यांनी हिंदी भाषेत भावानुवादित केले आहे. याला भारत सरकारने ही प्रायोजकत्व दिले आहे. गदिमांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून कोथरुड मध्ये याचे आयोजन करण्यात आले असून; १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वा. ते १२.३० वा. या वेळेत कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा सर्व गदिमा प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment