[ad_1]

दीपक पडकर, पुणे: विविध आजारांवर उपयुक्त असणाऱ्या ‘पॅशन फ्रुट’या नवख्या फळ पिकाचा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील अमर पांडुरंग बरळ या युवा शेतकऱ्याने यशस्वी केला आहे. विशेष बाब म्हणजे ‘पॅशन फ्रुट’ या फळ लागवडीचा या परिसरातील पहिलाच प्रयोग आहे.’पॅशन फ्रुट’या फळांमध्ये मानवी आरोग्यासाठी लाभदायक असणारे विविध गुणधर्म लपलेले आहेत. या फळा संदर्भात महाराष्ट्र टाइम्सने घेतलेला हा विशेष रिपोर्ट…

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील प्रयोगशील युवा शेतकरी अमर पांडुरंग बरळ यांनी राजस्थान मध्यप्रदेश सीमेवरील किसान गड येथून बिया आणून नैसर्गिक रोपे तयार केली. तयार झालेली शंभर रुपये त्यांनी आपल्या पाऊण एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने त्याची लागवड केली. म्हणजेच ओळीतील अंतर दहा फूट आणि रोपातील अंतर सात फूटवर बांबूच्या साह्याने लागवड केली.

‘पॅशन फ्रुट’हे वेलवर्गीय फळ आहे. त्यामुळे याला औषधाची गरज भासत नाही. शेणखताचा वापर केल्याने फळे चांगली लागतात. या फळाला कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. केवळ फळ माशांवर नियंत्रण ठेवावे लागते यासाठी या युवा शेतकऱ्याने फळ माशांचे ट्रॅप लावून माशांवर नियंत्रण ठेवले आहे.’पॅशन फ्रुट’हे शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने पिकवले जात आहे. सध्या हे फळ काढणीला आले आहे.
योगेश घोलप शरद पवारांच्या भेटीला, ठाकरे गटात खळबळ, देवळालीचं समीकरण बदलणार, सरोज अहिरेंचं टेन्शन वाढणार?

ऑनलाइन विक्री करण्याचा मानस…

मेट्रो सिटी मध्ये या फळाला सर्वाधिक मागणी आहे. सुरुवातीला या फळांच्या विक्रीचे व्यवस्थापन पुणे येथे केले होते. सध्या उत्पादन जास्त असल्याने बरळ या शेतकऱ्याचा ऑनलाइन विक्री करण्याचा मानस आहे. बिगबास्केट, ॲमेझॉन, रिलायन्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून मागणी आहे. त्यानुसार सॅम्पल देऊन दर निश्चित केला जाणार आहे. त्यानुसार फळांची विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या फळ पिकाच्या लागवडीसाठी स्टेजिंग करणे आवश्यक असते. यासाठी एकूण तीन लाख रुपये खर्च आला एकदा स्टेजिंग केल्यानंतर पुढे दहा ते बारा वर्ष त्याचा खर्च येत नाही. आत्ता काढणीला आलेल्या पिकातून साडेतीन ते टन माल निघेल. आणि त्याच्यातून ४ लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा असल्याचे बरळ यांनी सांगितले..
मोहम्मद सिराजने बदलला ९१ वर्षांचा इतिहास, कोणत्याही भारतीय खेळाडूला हे जमलं नाही

‘पॅशन फ्रुट’या फळाचे गुणधर्म..

  • डेंगूं आजारावर लाभदायक
  • पांढऱ्या पेशी नियंत्रणात ठेवते
  • रोग प्रतिकारशक्ती वाढवते
  • हृदयासाठी लाभदायक
  • विटामिनसीने युक्त

मोहम्मद सिराजने सांगितलं यशाचे रहस्य, कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं जाणून घ्या…

डेरीला दूध देऊन फायदा मिळेना, स्वतःचा व्यवसाय थाटला अन् कमावतायत भरघोस उत्पन्न

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *